न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)
Vishwajeet Shinde of Tamkhada village succeeds in Junior Under Twenty Relay

आनंद पवार (आसू ) फलटण तालुक्यातील तामखडा गावचा विश्वजीत शिंदे यांनी पुणे येथे झालेल्या ज्युनियर अंडर ट्वेंटी रिले स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.       

       जाधववाडी तामखडा येथील विश्वजीत गोरख शिंदे यांनी पुणे येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन ,ज्युनियर अंडर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ही स्पर्धा पिंपरी चिंचवड येथे राज्य अथलेटिक्स असोसिएशन ऑफ पिंपरी-चिंचवड शहर यांनी आयोजित केली होती या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य सह देशातील इतर स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता यामध्ये 400 मीटर व 200 मीटर धावणे प्रकारात तामखडा च्या विश्वजीत शिंदे याने तृतीय क्रमांक पटकावला विश्वजीत च्या यशाबद्दल त्याचा तामखडा जाधव वाडी गाव च्या वतीने भव्य असा सत्कार करण्यात आला.

यावेळी मुंजवडी येथील प्रसिद्ध चित्रपट निर्माते घनश्याम येडे, जाधववाडी गावचे सरपंच दयाराम ठेंगील ,उपसरपंच संभाजी जाधव ,संभाजी पांडुरंग जाधव, चंद्रकांत जाधव, माजी सरपंच अर्जुनराव जाधव, संतोष सुळ, राजेंद्र जाधव, दादा जाधव पवारवाडी गावचे माजी सरपंच अनिल राव जाधव, धनंजय पवार ,गोरख पवार यांच्या सह भागातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योजक गोरखशेठ शिंदे यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य संजय शिंदे यांनी मानले कार्यक्रमास परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा