न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण : सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारने विविध योजना व विकास कामांच्या माध्यमातून काम केले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी आपण निवडणूक लढवीत आहोत, या निवडणुकीत फलटण तालुक्यातून आपण एक लाखाचे मताधिक्य मिळवू असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

        तरडगाव व हिंगणगाव गटात आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यानी प्रचार दौरा केला, त्यावेळी हिंगणगाव येथे ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, धनंजय साळुंखे-पाटील, सचिन कांबळे-पाटील आदींची उपस्थिती होती. 

        मला मिळालेली खासदारकी हा फलटण तालुक्याचा बहुमान आहे, हा बहुमान टिकवायचा की नाही ते तुमच्या हातात आहे. फलटण तालुक्यातून एक लाखाचे मताधिक्य मिळाले तर तो मी माझा बहुमान समजेन. फलटण तालुक्याच्या हिताच्या सर्व प्रकल्पाना व योजनांना कोणी विरोध केला, फलटणकरांच्या तोंडचे पाणी कोणी पळवले व त्यांना कोणी साथ दिली हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे जर कोण तुतारी घेऊन आला तर लोक फुकरी काढतील असा टोलाही खासदार निंबाळकर यांनी यावेळी लगावला.

      यावेळी 'कहो फिरसे ; खासदार रणजितदादा फिरसे' या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्याचा आढावा घेणारे पथ नाट्य सादर करण्यात आले. 

चौकट - 

लोकसभेची ही निवडणूक फलटण तालुक्याच्या अस्मितेची आहे. मी व माझ्यासारखे फलटण तालुक्यातील अनेक शिलेदार रणजितसिंह यांना मोठे मताधिक्य मिळून देऊ. गेली तीस वर्षे ज्यांना सत्ता दिली त्यांनी प्रत्येक निवडणुकीत केवळ गाजर दाखविण्यापालिकडे काहीही केले नाही. सर्वसामान्य जनता आपला स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा खासदार करेल असा विश्वास जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

 

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा