न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण दि. २ : पाटबंधारे मंत्री असताना नीरा - देवघर धरण प्रस्ताव संमतीसाठी आला असता त्यामध्ये फलटण व माळशिरस तालुक्यांचा समावेश नसल्याने तत्कालीन पाटबंधारे मंत्री विजयसिंह मोहिते पाटील तथा दादा यांनी सही केली नाही म्हणून वसंतदादा पाटील यांनी अन्य मंत्र्याची फेर बैठक घेतली, आणि फेर प्रस्तावात फलटण व माळशिरस तालुक्याचा नीरा - देवघर लाभक्षेत्रात समावेश केल्यावर मोहिते पाटील यांनी प्रस्तावास संमती दिल्याने पाणी या भागात पोहोचले ही वस्तुस्थिती असताना आताचे खासदार व घाटावरील आमदार आम्ही हे केल्याचे सांगत पाणीदार खासदार म्हणून मिरवत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व मित्र पक्षांचे उमेदवार धैर्यशिल मोहिते पाटील यांनी सांगितले.

   हिंगणगाव ता. फलटण येथे कोपरा सभेत ते बोलत होते.

यावेळी धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, महेंद्र सूर्यवंशी बेडके शंभुराज खलाटे, पंकज पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी, हिंगणगाव व पंच क्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

      मोहिते पाटील पुढे म्हणाले, माढा लोकसभा मतदार संघात आणि फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या औद्योगिक वसाहती उभ्या करण्यापेक्षा सरकारी जमिनीवर छोटया औद्योगिक वसाहती उभारुन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा