न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

साखरवाडी प्रतिनिधी( किसन भोसले ) महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ साखरवाडी भागातील प्रत्येक घर टू घर जाऊन मतदारापर्यंत तुतारीचा प्रचार करण्यात येत असून या भागातून तुतारीला भरघोस मते मिळतील असा विश्वास राजे गटातील कार्यकर्ते फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर यांनी व्यक्त केला आहे

 माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार

धैर्यशील मोहिते पाटील यांची या भागात नुकतीच भेट झाली असून या भेटीत त्यांनी साखर कामगार व्यापारी शेतकरी शेतमजूर यांच्याशी संवाद साधला यावेळी प्रामुख्याने कामगार प्रतिनिधी व साखरवाडी भागातील ग्रामस्थ राजे गटातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते उन्हाळ्याच्या तीव्रतेची परवा न करता राजे गटातील कार्यकर्ते तुतारीचे चिन्ह घरोघरी पोचवण्याचे काम करत असल्याने शरद पवार यांच्या विचाराला साथ देण्यासाठी मतदारांची मानसिकता असल्याचे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन व राजे गटाचे प्रतिनिधी नितीन शाहूराजे भोसले यांनी सांगितले साखरवाडी जिल्हा परिषद गट व होळ पिंपळवाडी खामगाव जिंती फडतरवाडी या भागातून तुतारीला लीड मिळेल असेही राजे गटाचे कट्टर समर्थक या भागातील उद्योजक संजय भोसले यांनी सांगितले

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा