न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत माढा लोकसभा मतदार संघातील मतदान केवळ ४/५ दिवसांवर येऊन ठेपले असताना युवा नेते सह्याद्री चिमणराव कदम यांनी माढा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि मित्र पक्षांचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या निवडणूक प्रचारासाठी संपूर्ण फलटण तालुका अक्षरशः ढवळून काढला आहे.

     स्व. सू.शं. तथा चिमणराव कदम यांच्या निधनानंतर गेले काही दिवस सह्याद्री कदम यांनी तालुक्यातील स्व. चिमणराव कदम गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्यासह विविध समाज घटकांशी चांगला संपर्क ठेवला आहे, जयभवानी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातूनही त्यांनी उत्तम काम सुरु ठेवले असल्याने त्यांचा लोकसंपर्क उत्तम असल्याने या निवडणूक प्रचारा दरम्यान त्यांचे विविध गावात उत्स्फूर्त स्वागत होत आहे.

      दरम्यान खा. शरद पवार यांच्याशी असलेली ओळख आणि मोहिते पाटील कुटुंबाशी असलेले नाते संबंधाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकताच भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात काम प्रवेश करुन धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतल्याने स्व. चिमणराव कदम गटातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून तालुक्याच्या प्रत्येक गावातील स्व. चिमणराव कदम समर्थक उत्साहाने धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.

 

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा