न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

साखरवाडी प्रतिनिधी (किसन भोसले ) खामगाव तालुका फलटण येथील ग्रामपंचायत सदस्य संजय कुचेकर यांनी खासदार गटात नुकताच प्रवेश केला आहे राजे गटातून खामगाव ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवडून आलेले संजय कुचेकर हे गेले अनेक वर्षापासून विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राजे गटाचे कार्यकर्ते म्हणून सर्व परिचित होते खामगाव येथील राशन दुकानदार म्हणून त्यांची विशेष ओळख असल्याने भाजपचे माढा मतदार संघाचे लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या निवडणुकीमध्ये साथ देण्यासाठी संजय कुचेकर यांनी खासदार गटात प्रवेश केला असल्याचे समजते आहे 

या आधी साखरवाडी भागातून राजे गटातील पंचायत समितीचे माजी सदस्य सागर कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी खासदार गटात प्रवेश केल्यानंतर फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व साखरवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले यांच्याबरोबर काम करण्याच्या भूमिकेतून संजय कुचेकर यांनी रणजीत दादांना निवडून आणण्यासाठी ठाम भूमिका घेऊन खासदार गटात प्रवेश केला आहे असे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा