न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

 

फलटण -फलटण नगरपरिषद क्षेत्र एकल वापर प्लास्टिक मुक्त असावे यादृष्टीने जनजागृती करण्यासोबतच प्रतिबंधात्मक मोहिम प्रभावीपने राबविल्या जात आहेत.

एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमे अंतर्गत दि. 23 एप्रिल 2024 रोजी मा.मुख्याधिकारी निखिल मोरे साहेब यांच्या आदेशान्वये कार्यालय अधिक्षक श्री. रोहित जमदाडे यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता निरीक्षक, शहर समन्वयक तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नगरपरिषद हद्दीत तपासणी करून एकल प्लास्टिक वापरणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई करत प्लास्टिक जप्ती व दंडात्मक कारवाई करून रु.10,000/- दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. तसेच यापुढे देखील एकल प्लास्टिक चा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा मा. मुख्याधिकारी निखिल मोरे साहेब यांनी दिलेला आहे.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा