न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

साखरवाडी प्रतिनिधी( किसन भोसले ) साखरवाडी येथील मतदान केंद्रावर येथील रहिवासी नितीन लक्ष्मण धुमाळ हे मतदान करण्यासाठी गेले असता त्यांना मतदान अधिकाऱ्यांनी मतदान करण्यास रोखले

मतदान यादीवर नितीन लक्ष्मण धुमाळ यांच्या नावावर डिलीटेड असा शिक्का पडल्याने नितीन धुमाळ यांना मतदान करता आले नाही यावर नितीन धुमाळ यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता आता काहीही करता येणार नाही असे उत्तर मिळाले त्यानंतर नितीन धुमाळ संबंधित निवडणूक प्रक्रियेवर नाराज झाले आपल्याला मतदानाचा हक्क बजावता येणार नाही हे धुमाळ यांच्या लक्षात आल्यानंतर नितीन धुमाळ हे ऐकायला तयार नव्हते तेथील अधिकाऱ्यांची व त्यांची बाचाबाची सुरू झाली तेथे एकच गोंधळ उडाल्याने तेथे हजर असलेले केंद्रीय सुरक्षा यंत्रणेचे जवान यांची पळापळ सुरू झाली त्याबरोबर निवडणूक कक्ष अधिकारी होमगार्ड पोलीस यांनी 

 ही या साखरवाडीतील मतदान केंद्रावर धाव घेतली हा सर्व क्षण पत्रकारांच्या मार्फत टिपण्याचा प्रयत्न केला असता तेथील मतदान केंद्रावर कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने पत्रकारांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला यावेळी पत्रकार व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली यावेळी या बुत वरील मतदान प्रक्रिया थोडावेळ थांबली असता मतदान करण्यास आलेल्या काही मतदारांना थोडा वेळ गोंधळ शांत होईपर्यंत थांबावे लागले यावेळी मतदान प्रक्रियेतील वेळ वाया गेल्याने मतदार निवडणूक प्रक्रियेवर नाराज झाले होते

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा