न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

साखरवाडी ( किसन भोसले ) माढा मतदार संघाचे लोकसभेच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या साखरवाडी मध्ये माजी सरपंच विक्रमसिंह भोसले यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कोपरासभे दरम्यान होळमधील राजे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी माढा मतदारसंघाचे लोकसभेच्या निवडणुकीत उभे असलेले उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील माणिकआप्पा भोसले अमरसिंह नाईक निंबाळकर अमित रणवरे माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले साहेब भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले सागर कांबळे सुरेश पवार प्रयास भोसले राजेंद्र हिरालाल पवार संभाजीराव जाधव मारुती माडकर आनंद जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य सागर कांबळे यांच्या भाजप प्रवेशानंतर होळ मधील अनेक कार्यकर्त्यांना खासदार गटात जाण्याची मोठी उत्सुकता होती श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन राजे गटाचे कट्टर समर्थक व मधील लोकप्रतिनिधी नितीन शहुराजे भोसले यांच्या गटाला हा मोठा धक्काच म्हणावा लागेल 

ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी कालच्या कोपरासभेत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत कमळ हातात घेतले यामध्ये अशोक सिताराम भोसले निलेश दिलीप कांबळे नंदू सिताराम भिसे प्रकाश भिसे ज्ञानेश्वर भिसे राहुल पवार तेज कुमार भोसले राणाप्रताप भोसले राहुल रिठे इत्यादींचा समावेश आहे 

पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विश्वास ठेवून व त्यांच्या राजकीय प्रवासाला तसेच रणजीतदादांना पुन्हा दिल्लीला खासदार म्हणून पाठवण्यासाठी व त्यांना या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे खासदार गटाचे होळ मधील एकनिष्ठ कार्यकर्ते राजेंद्र हिरालाल पवार यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा