न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण -: दरारा असावा पण दहशत नसावी असे सांगत फलटण दहशत मुक्त करण्यासाठी या वेळच्या निवडणुकीत आपण खा. शरद पवार यांचे नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्यांचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला आहे, त्यासाठी आपली साथ आवश्यक असल्याचे स्पष्ट प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
       माढा लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातील प्रचाराचा शुभारंभ येथील श्रीराम मंदिरात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून समारंभपूर्वक करण्यात आल्यानंतर मुधोजी मनमोहन राजवाड्यासमोर आयोजित प्रचार सभेत अध्यक्षस्थावरुन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, बाबाराजे देशमुख, डॉ. विजयराव बोरावके, महादेवराव पवार तथा आबा, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अच्युतराव खलाटे, काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके, तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, कार्याध्यक्ष अमीरभाई शेख, शहराध्यक्ष पंकज पवार, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. प्रियालक्षमीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्त्यजितराजे नाईक निंबाळकर, विश्वजित मोहिते पाटील, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे व त्यांचे सहकारी संचालक, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, दूध संघाचे चेअरमन धनंजय साळुंखे, माजी सभापती शंकरराव माडकर, संतकृपा उद्योगाचे विलासराव नलवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव धुमाळ, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष संजय भोसले, तालुकाध्यक्ष प्रदीप झणझणे, आम आदमी पार्टीचे धैर्यशील लोखंडे, विकास नाळे, वीरसेन सोनवणे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती माजी पदाधिकारी, सदस्य, नगर परिषद माजी नगराध्यक्ष व सदस्य, सोसायटी व ग्रामपंचायत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार बंधू - भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   ज्यानी मागच्या निवडणुकीत लाखाचे मताधिक्य दिले त्या मोहिते पाटील किंवा मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता भाजपने आपला उमेदवार जाहीर केल्याने सर्वच मित्र पक्षांनी नाराजी व्यक्त करीत या उमेदवाराला निवडून देण्यासाठी नकार दिला किंबहुना अन्य पक्षात जाण्याची भाषा पदाधिकारी कार्यकर्त्यांमधून सुरु झाल्याने आम्ही उमेदवार बदलाची मागणी केली मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने कार्यकर्त्यांसाठी आम्हाला धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा द्यावा लागल्याचे निदर्शनास आणून देत त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
      माढा लोकसभा मतदार संघातील ऐतिहासिक वास्तू, पाऊल खुणा मुधोजी मनमोहन राजवाडा आणि नाईक निंबाळकर राजघराण्याशी जुळणाऱ्या असून हा संपूर्ण भाग आमच्या आपुलकीचा, प्रेमाचा असल्याने आणि मोहिते पाटील घराण्याशी ही या भागाचे ऋणानुबंध तितकेच मजबूत असल्याने आम्हाला धैर्यशील मोहिते पाटील निवडून येतील याबाबत शंका नाही, आता मोठे मताधिक्य मिळाले पाहिजे यासाठी साथ करण्याचे आवाहन करताना त्यासाठी खा. शरद पवार यांचा करिश्मा आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे आशीर्वाद निश्चित उपयुक्त ठरतील असा विश्वास श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
    प्रारंभी डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात निवडणुकीची पार्श्वभूमी विस्ताराने सांगून श्रीमंत संजीवराजे यांना उमेदवारी मिळावी अशी आमची मागणी होती, तथापि आता निर्णय झाल्याने आम्ही धैर्यशील मोहिते पाटील यांना निश्चित निवडून आणणार याची ग्वाही देताना आता तुम्ही पण पुढच्या वेळी आम्ही हे सूत्र स्वीकारा असे आवाहन मोहिते पाटील यांना केले.
      ज्येष्ठ नगर सेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख संजय भोसले, काँग्रेस सरचिटणीस डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके, आपचे धैर्यशील लोखंडे यांची समयोचीत भाषणे झाली. प्रा. भिमदेव बुरुंगले यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.
   सभेपूर्वी श्रीराम मंदिर फलटण येथे विजयसिंह मोहिते पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

 

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा