न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)
ज्यांच्याकडे निजाम काळातील महसुली आणि शैक्षणिक नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखला देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती

जालना - मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कुणबी समाजाला मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळावे या मागणी करिता मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातआमरण उपोषण सुरू केले आहे.

 

या उपोषणाचा आजचा १० वा दिवस आहे. काल ज्यांच्याकडे निजाम काळातील महसुली आणि शैक्षणिक नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखला देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यांच्या या निर्णयाचे मनोज जरांगे पाटील यांनी स्वागत केलकाय. म्हणाले जरांगे पाटील?"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल मराठा समाजाच्या संदर्भात निर्णय घेतले, अध्यादेश काढले. जीआर संदर्भात (GR) अधिकृत माहिती आलेली नाही. कालच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, मात्र ज्यांच्याकडे वंशावळी असतील त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल, असा निर्णय आहे. त्यामुळे झालेल्या निर्णयाचा आम्हाला काहीच फायदा नाही."

 

वंशावळ शब्द काढून टाका...

 

"सरकारचा निर्णय चांगला आहे. आम्ही दहा पावले मागे यायला तयार आहोत, मात्र त्यामध्ये थोडी सुधारणा करा. जिथं वंशावळी शब्द आहे, त्या दोन शब्दाच्या जागेवर थोडी सुधारणा करा, वंशावळ शब्द काढून टाका" असे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यावेळी म्हणाले.

आंदोलनावर ठाम....

 

"सरकारी जीआरमध्ये बदल करुन वंशावळीचे दस्तावेज शब्द काढून सरसकट करावे, तो जीआर तुम्ही घेवून या अथवा कुणालाही पाठवा, तसेच आंदोलकांवर केलेले गुन्हे मागे घ्या.. तशाप्रकारचा जीआर निघेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले, तसेच चर्चेसाठी आम्ही तुम्हाला निमंत्रण देत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा