न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी बंद व आंदोलन होत असतानाच, फलटणयेथे उद्या चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा फलटण समन्वयकांच्या वतीने देण्यात आली.

 फलटण येथे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक आज पार पडली या बैठकीत जालना येथील लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरंगे पाटील व इतर सहकारी यांच्यावर पोलिसांनी केलेल्या अमानुष गोळीबार/लाठीचार्ज या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व मराठा समाजाला ओबीसीतून 50टक्के च्या आतून आरक्षण मिळवण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील चौक फलटण येथे चक्का जाम आंदोलन सोमवार दि.4 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता करण्याचे सर्वानुमते निश्चित झाले असून मराठा समाजातील बांधवानी हजारोंच्या संख्येने आपल्या वाहनांच्या उपस्थित राहावे असे मराठा क्रांती मोर्चा फलटण यांनी केले असून या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून राज्य सरकारला बांगड्यांचा आहेर देण्यात येणार आहे.

 

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा