न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)
Speed ​​bumps and directional stripes should be put on Jinti Naka - Demand of Hon'ble Corporator Ashokrao Jadhav

फलटण - आळंदी ते पंढरपूर हा वर्दळीचा महामार्ग फलटण शहरातून जातो. त्यामध्ये फलटण शहरातील जिंती नाका ह्या परिसरामध्ये रोजच छोटे – मोठे अपघात हे होत असतात. काही दिवसांपूर्वी जिंती नाका येथे सकाळी वर्दळ नसताना एका वृद्ध महिलेला अपघातात जीव घालवावा लागलेला आहे. ह्या पूर्वी सुद्धा ह्या ठिकाणी काही जणांना आपला जीव अपघातामध्ये गमवावा लागलेला आहे. तरी शहरातील जिंती नाका ह्या परिसरामध्ये गतिरोधक तयार करावेत त्यासोबतच दिशादर्शक पट्टे आखावेत अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडीचे फलटण तालुका अध्यक्ष अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.

 

 

याबाबतचे सविस्तर निवेदन फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना माजी नगरसेवक व भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडीचे फलटण तालुका अध्यक्ष अशोकराव जाधव यांनी दिलेले आहे. 

यावेळी माजी नगरसेवक सचिन अहिवळे, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

सदरील प्रश्नाबाबत फलटण नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग हे उडवा उडवीची उत्तरे देत असून यामध्ये स्वतः प्रांताधिकारी यांनी लक्ष घालून जिंती नाका येथे गतिरोधक तयार करून दिशादर्शक पट्टे आखावेत. शहराच्या मलठण भागामधील नागरिकांना रोज विविध कामांसाठी जिंती नाका येथून ये जा करावी लागती, त्यामुळे सदरील ठिकाणी लवकरात लवकर कार्यवाही करून होणारे अपघात कमी होण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा