न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

मुंबई - गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा मोठा निकाल समोर आला असून शिवसेनेच्या दोन्ही गटातील कोणताही आमदार अपात्र ठरलेला नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) समतोल निर्णय घेत शिंदे गट (Eknath Shinde) आणि ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) आमदारांना अपात्र ठरवलेलं नाही. त्यामुळे हा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयामध्ये होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी ठाकरेंपासून वेगळा सवतासुभा मांडत भाजपशी घरोबा केला आणि सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला. नंतर निवडणूक आयोगाने हा त्यांच्या बाजूने निर्णय घेत त्यांचा हा दावा योग्य ठरवला. या दरम्यान ठाकरे गटाच्या वतीनं शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या विरोधात पक्षांतरबंदी कायद्यान्वये याचिका दाखल केली. त्याचवेळी शिंदे गटाच्या वतीनंही ठाकरे गटातील 14 आमदारांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. 

सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं सांगत त्यांच्याकडे चेंडू टोलवला होता. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आजचा हा निर्णय घेतला. 

सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणार

शिंदेंच्या आमदारांना नाराज केल्यात ते नाराज होऊ शकतात, तर ठाकरेंच्या आमदारांना अपात्र ठरवल्यात ते नाराज होऊ शकतात. त्यामुळे यामध्ये एक सुवर्णमध्ये साधला गेला असून दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं गेलं नाही. त्यामुळे आता आमदारांच्या अपात्रतेचा हा निर्णय सर्वोच्य न्यायालयात होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा