न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण : कॉलेजमधील गॅदरिंगमध्ये झालेल्या भांडणांच्या कारणावरून एकास जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्या प्रकरणी दोघांवर फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

       करण कानिफ घोलप रा. मंगळवार पेठ, फलटण व यशराज कृष्णाजी पिसाळ रा. कोळकी ता. फलटण अशी गुन्हा नोंद झालेल्या संशयीतांची नावे आहेत. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी, राजरत्न जयवंत जगताप वय २२, रा. जाधववाडी ता. फलटण याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक २६ डिसेंबर रोजी मळजाई मंदिर परिसरातील कच्च्या रस्त्यावर रात्री साडेआठच्या सुमारास त्यास घोलप व पिसाळ यांनी कॉलेजमधील गॅदरिंगच्या कार्यक्रमांमध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरून जातिवाचक शिवीगाळ करत, जीवे मारण्याची धमकी देऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. यावरून करण घोलप व यशराज पिसाळ यांच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अतुल सबनीस हे करीत आहेत.

 

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा