न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण - दिनांक 2.04.2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजण्याचे सुमारास आदर्की खु ता. फलटण जि. सातारा गावचे हाहीत चिचेचा महां नावचे शिवारात चंद्रशेखर बबनराव निंबाळकर वय 48 वर्षे रा आदर्की खु//ता. फलटण यांनी सयाजी शंकर निबाळकर रा आदकी खु// ता. फलटण यांचे शेताचे बांधावरुन बोअरवेलची मशीन व पिकअप जीप नेवुन बांध खराब केल्याचा राग मनात धरुन आरोपी सयाजी शंकर निंबाळकर याने चंद्रशेखर निंबाळकर यांचे डोक्यात कु-हाडीचे घाव घालून गंभीर जखमी करून खुन केला म्हणून वगैरे मजकुरचे फिर्याद हि मयताचा मुलगा चैतन्य चंद्रशेखर निंबाळकर याने लोणंद पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने गुन्हा रजि. दाखल करण्यात आला आहे.

 

श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा, श्रीमती ऑचल दलाल अपर पोलीस अधीक्षक, श्री. राहुल रा.धस उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण यांना सदर घटनेबाबत माहीती दिली असता त्यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुशिल बी. भोसले, तपास सुरु केला. आदर्की बु. व आदर्की खुर्द गावातील लोकांना ग्रामसुरक्षा यंत्राणा याबर आरोपी सयानी शंकर निंबाळकर रा. आदर्की खुर्द ता. फलटण याचा शोध घेणेकामी सुचना दिल्या. मा. श्री राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग हे घटनास्थळी दाखल झाले त्याचे मार्गदर्शनाखाली आरोपी हा आदर्की गावात चिचेचामळा नावचे शिवारात ओठ्या जवळ असले बाबत बातमीदाराचे मार्फत माहीती मिळाल्याने आम्ही आदर्की खुर्द गावातील ग्रामस्थ व पोलीस स्टाफ यांचे मदतीने आरोपीस सापळा रचुन पकडुन त्याला गुन्हयाचे कामी अटक केली. सदर आरोपीस मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी फलटण न्यायालय हजर ठेवुन त्याची पोलीस कोठडीची मागणी केली असता सदर आरोपीस दिनांक 8/4/2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि श्री सुशिल भोसले हे करीत आहेत

 

श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक, श्री. राहुल रा.धस उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. सुशिल बी. भासल, सहायक पोलीस निरीक्षक, शिवाजी काटे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार महेश सपकाळ, नितीन भासल, नाना भिसे, चंद्रकात काकडे, विठ्ठल काळे, अभिजीत घनवट, बापु मदने, सतिश दडस, सिध्देश्वर वाघमोडे, चालक संजय चव्हाण यांनी सदरची कारवाईत सहभाग घेतला आहे. मा. पालीस अधीक्षक सो सातारा यांचे मान्यतेने

(सुशिल बी. भोसले) सहा. पोलीस निरीखक, लोणंद पोलीस स्टेशन

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा