न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

आनंद पवार 

फलटण - फलटण पुसेगाव या प्रमुख मार्गावर असणाऱ्या ताथवडा घाटात लूटमार करणाऱ्या टोळीच्या फलटण ग्रामीण पोलिसांनी पाच आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे त्यांच्याकडून तब्बल २ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार फलटण येथील कुरिअर बॉयची मानेवाडी गावाध्ये लूट केली होती संबंधित आरोपींनी आमचे पार्सल आहे का असे बळजबरीने विचारत कुरिअर बॉय कडे असणाऱ्या मोबाईल, रोख रक्कम व पार्सल असा एकूण ५२००० चा मुद्देमाल व बॅग जबरदस्तीने चोरून नेली याबाबतची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला होता च याबाबत तपासाची सूत्रे गतीने फिरवण्यात आली फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन ने कसून तपास केला असता अजय संभाजी मदने वय २१ मु. पो. डीस्कळ ता. खटाव जिल्हा सातारा, अक्षय संभाजी जाधव वय २७, मोळ ता. खटाव जिल्हा सातारा ,निखिल उमाजी बुधावले वय २१ बुधावलेवाडी ता. खटाव जिल्हा सातारा आदित्य रामचंद्र शिरतोडे वय१९ ललगुण ता. खटाव जिल्हा सातारा आकाश प्रभाकर जाधव वय २२कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या सर्वांचा पोलिसांनी पाठलाग केला असता त्यांना पोलीस खाक्या दाखवताच त्यांच्याकडून दोन मोटरसायकल सह एकूण 2 लाख ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  वाखरी तालुका फलटण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या पेट्रोल पंपावरील कामगारालाही याच गुन्ह्यातील आरोपींपैकी अजय संभाजी मदने व निखिल उमाजी बुधावले यांनी तलवारीचा धाक दाखवून रोकड लंपास केली होती व ताथवडा घाटामध्येही अनेकांना लुटमारीचे प्रकार सुरू होते संबंधित आरोपींना फलटण न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात.

  संबंधित आरोपींच्या मुसक्या ग्रामीण पोलिसांनी आवळल्या असून सदरची कामगिरी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अंचल दलाल मॅडम उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या सूचनेनुसार व फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर आरगडे प्रमोद दीक्षित ,पाटील साहेब ,पोलीस अंमलदार योगेश रणपिसे, नितीन चतुरे ,अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, विक्रांत बनकर, हनुमंत दडस, श्रीकांत खरात, विक्रम कुंभार व तुषार नलावडे यांनी या करवाई मध्ये भाग घेतला.

 

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा