न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण ( प्रतिनिधी) शिवाजीनगर नीलकमल आपारर्मेंट, फलटण येथील बंद असलेल्या फ्लॅटचे सेफ्टी व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूम मधील कपाटातील अडीच लाख रुपये रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिन्यासह सव्वा पाच लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेहल्याची घटना घडली.

  याबाबत फिर्यादी हरिभाऊ नामदेव खरात यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दि.8नोव्हेंबरला फिर्याद दिली आहे.

  याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून तसेच फिर्यादी हरिभाऊ खरात यांनी दिलेल्या तक्रारीतून मिळालेले अधिक माहिती अशी हरिभाऊ खरात हे पत्नीसह शिवाजीनगर येथील नीलकमल आपार्टमेंट मधील चौथ्या माळ्यावर राहतात. दिनांक 7 रोजी त्यांची पत्नी मलवडी ता माण येथे सकाळी नोकरीच्या ठिकाणी गेल्या. तर हरिभाऊ खरात हे ही सायंकाळी चारच्या सुमारास मलवडी येथे गेले. दिनांक आठ रोजी त्यांच्या शेजाऱ्यांनी फोनवरून सांगितले की तुमच्या घराचा सेफ्टी दरवाजा मुख्य दरवाजा उघडा आहे कुलुपे खाली पडलेली आहेत.

  फिर्यादी खरात तातडीने दहा वाजता तिथे पोहोचले .घरात प्रवेश केल्यानंतर घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. बेडरूम मध्ये जाऊन पाहिले तेथेही बेडरूम मध्ये लोखंडी कपाट फोडलेले आतील सामान विस्कटलेले दिसले,लॉकर फोडलेले दिसले. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी लॉकर तपासले त्यातील रोख रक्कम व दागिने मिळून आले नाहीत.लाॅकरमधील रोख 2,50,000हजार रुपये जे की मुलीचे लग्नासाठी वेळोवेळी बँकेतून काढून आणून ठेवले होते.अपार्टमेंट मेंटेनन्सचे खर्चासाठीचे 8210रुपये, तसेच सोन्याची अंगठी, गळ्यातील साखळी, कर्णफुले, चांदीचे दागिने, घड्याळ असा 263000 हजाराचा ऐवज असे एकूण पाच लाख 21 हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेहल्याची फिर्याद त्यांनी दिलेली आहे. अधिक तपास पोलीस इन्स्पेक्टर सुरज शिंदे करीत आहेत.घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

 

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा