न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)
Computer operator in Phaltan tehsil office caught in bribery scam

फलटण  :- एका तरुणास शासनामार्फत मिळणारे अनुदान खात्यावर वर्ग करून देण्यासाठी ६१० रुपयांची मागणी करून रक्कम स्वीकारताना फलटण तहसील कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागाच्या संगणक चालकास लाच लुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे.

लाच लुचपत विभाग सातारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण तहसील कार्यालय येथील रोजगार हमी योजना विभागातील अमोल दिलीप जठार (वय - ३८ वर्षे राहणार बिरदेव नगर, जाधववाडी ता.फलटण) या संगणक चालकाने तक्रारदार तरुण यांची वडिलोपार्जित शेत जमिनीमध्ये रेशीम उद्योग साठी आवश्यक असणारे शेड उभारणी करून त्यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान तक्रारदार तरुणांच्या खात्यावर वर्ग करून देण्याच्या मोबदल्यात दारू व जेवनाचे पैसे असे एकूण ६१० रुपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारताना संगणक चालक अमोल जठार यास तहसील कार्यालयाच्या तळमजल्यावरील फलटण कृषी कार्यालय येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

सदरची लाचलुचपत ची कारवाई झाल्याने फलटण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे सुरज गुरव अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे सुहास नाडगौडा याचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक, ला. प्र. वी. सातारा अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस नाईक विनोद राजे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, निलेश येवले लाप्रवि सातारा यांनी केली आहे.लाच मागणी संदर्भात तक्रारी असल्यास पोलिस उपअधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंध विभाग, सदर बझार, सातारा येथे अथवा कार्यालय दूरध्वनी क्रमांक ०२१६६-२३८१३८ तसेच १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्यावतीने करण्यात आले आहे

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा