न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

आसू आनंद पवार.

वाढत्या उन्हामुळे शेतपिकांना पाणी देण्यासाठी फलटण तालुक्यात नीरा उजवा कॅनाॅलच्या पाण्याचे आवर्तन सोडावे अशी मागणी फलटण पुर्व भागातील शेतकरी करीत आहेत.

     

  फलटण पूर्व भागातील बागायती पट्ट्यातील अनेक गावांमध्ये ऊस शेती मोठ्या प्रमाणात केली जाते जून जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये उसाच्या लागणी होत असतात पूर्णपणे पाण्याचे नियोजन करून या उसाच्या लागणी केल्या जातात परंतु यावर्षी मार्च मध्येच वातावरणात पूर्ण बदल झालेला दिसत असून सकाळी थंडी, दुपारी ढगाळ वातावरण आणि सायंकाळी गर्मी . अधूनमधून ढगाळ वातावरण असे पाहायला मिळत आहे त्याचा परिणाम विहिरीतील पाणी पातळी घटण्यवर होत आहे. अनेक विहिरींची पाणीपातळी घटल्याने ऊस शेतीला पाणी देण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

        नीरा उजवा कालवा पूर्णपणे भरून वाहत असतानाही फलटण पूर्व भागात गरज असताना आवर्तन का सोडले जात नाही असा सवाल उपस्थित होत आहे .संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता स्वतः पाहणी करून कॅनालवरील सर्व च फाट्याना पाणी सोडावे अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.

   या भागामध्ये पाणी वापर संस्था कार्यरत आहेत. त्या संस्थाही योग्य वेळी पाण्याची मागणी करतील.आता पिकांना पाणी मिषणे गरजचे आहे. जर पाणी सोडण्यास उशीर झाला तर वातावरण बदलाबरोबरच कॅनॉलचे पाणी वेळेवर न मिळाल्यास पिकांचे नुकसान होऊ शकते. 

  नीरा बागायती पट्ट्यातील अनेक गावांमध्ये ऊस मका कडवळ यासारखी पिके शेतात उभी आहेत. इरिगेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागात पाण्याचे आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा