न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण प्रतिनिधी - डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न, अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,"उद्यानविद्या महाविद्यालय सांगुळवाडी". यांच्या तर्फे,भुईबावडा ता.वैभववाडी जि. सिंधुदुर्ग येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले.

    दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या ए. आर. कामतेकर, समन्वयक पी.एस.सावंत सहाय्यक पी.डी.काळे, तसेच एन. आर. फुटाणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले,१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमीत्त,उद्यानविद्या महाविद्यालय सांगुळवाडी ता. वैभववाडी जि. सिंधुदूर्ग अंतर्गत ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम सन २०२३-२४.केंद्र भुईबावडा येथे कृषिकन्यांनी वृक्षारोपण, इन्फॉर्मेशन कॉर्नर (Information corner) व बक्षिस वितरण व वन्यजीव संरक्षण या विषयावर प्रभातफेरी असे विविध कार्यक्रम राबवले गेले आहेत. 

     मौजे भुईबावडा ता. वैभववाडी जि. सिंधुदुर्ग येथे दिनांक:१४/०८/२०२३ रोजी विविध देशी झाडे आवळा,जांभूळ,करंज,काजू, इत्यादींचे वृक्षारोपण करण्यात आले, मौजे भुईबावडा येथे 'इन्फॉर्मेशन कॉर्नर या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, त्यामध्ये कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची तसेच शेतकऱ्यांना उपयुक्त असणाऱ्या योजणांची माहीती दिली.

तसेच दिनांक:१५/०८/ २०२३ रोजी, श्री गांगेश्वर विद्यामंदिर भुईबावडा येथे दि.११ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले,तसेच दि १५/०८/२०२३रोजी, वन्यजीव संरक्षण' या विषयावर १ ली ते ४ थी व ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी घेण्यात आली,या प्रसंगी, भुईबावडा गावचे सरपंच बाजीराव मोरे,तसेच ग्रामसेवस बोडेकर व इतर ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक व ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन सांगुळवाडी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या कृषीकन्या,अनुराधा माळी, सायली गजमल,करिश्मा मुलाणी,नेहा खलाटे, विभावरी शिंदे व सानिका रेंदाळकर यांनी केले होते.वैभववाडी(सिंधुदुर्ग) - डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न, अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,"उद्यानविद्या महाविद्यालय सांगुळवाडी". यांच्या तर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी,व शालेय मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा