न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटणकरांची खास पसंती महाराष्ट्रीयन मसाले

साखरवाडी - प्रतिनिधी 

 फलटण येथील डेक्कन आणि उमाजी नाईक चौकाच्या मध्य स्थानी म्हणजे स्टेट बँकेच्या मागील रस्त्यालगत असणाऱ्या महाराष्ट्रीयन मसाले आणि ड्रायफूडच्या दुकानात ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते साखरवाडी तालुका फलटण येथील वैभव भोसले आणि धनंजय भोसले यांनी हा व्यवसाय केवळ ग्राहकांच्या मागणीनुसार निवडला आहे अलीकडे भेसळयुक्त आणि विदेशी पदार्थांनी तोंडाची चव पळवली असल्याने भोसले बंधूंनी अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेले मसाले स्वतः घरगुती आचार व स्वादयुक्त बनवून फलटणकरांसाठी चांगलीच मेजवानी दिली आहे हा व्यवसाय चालू केल्यापासून केवळ घरगुती पद्धतीने बनवलेले गावरान व भेसळ प्रतिबंधक आणि रंगविरहीत मसाले विकत घेण्यासाठी यांच्या दुकानात नेहमीच गर्दी असते तसेच सर्व प्रकारचे दर्जेदार ड्रायफूडस् म्हणजे काजू बदाम अक्रोड खजूर बेदाणे चारोळी इत्यादी सर्व व चटण्या लोणची पावभाजी मसाले सांबर बिर्याणी चिकन मटन इत्यादी मसाले अस्सल गावरान पद्धतीने बनवलेले असल्याचे वैभव भोसले यांनी सांगितले यासाठी फलटण मधील आमच्या दुकानाला एक वेळ अवश्य भेट द्यावी असेही भोसले बंधूंनी आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा