न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)


            साखरवाडी प्रतिनिधी ( किसन भोसले )केंद्र शासनाच्या कृषी रोबोटिक तंत्रज्ञानातून तयार झालेल्या चेन्नई येथील गरुडा एरोस्पस कंपनीच्या किसान ड्रोन चे प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्र माळेगाव बारामती येथे नुकतेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर  यांनी पाहून या अजोड तंत्रज्ञानाचे कौतुक केले या प्रात्यक्षिका वेळी  संजीवराजे यांनी किसान ड्रोन ची संपूर्ण माहिती घेऊन या तंत्रज्ञानाचा वापर ही आधुनिक शेतीची काळाची गरज असून या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पाणी तसेच पैशाची बचत होणार असून महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ड्रोन खरेदी केल्यास ४० टक्के सबसिडी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून समृद्ध व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन धोरणानुसार जिल्ह्यातील सर्व विकास सेवा सोसायट्यांनी गरुडा किसान ड्रोन खरेदी करून शेतकरी सभासदांना योग्य दरात औषध फवारणी करून द्यावी व नवीन व्यवसायात पदार्पण करण्याचे आवाहन केले.


                 केंद्र शासनाच्या कृषी रोबोटिक तंत्रज्ञानातून तयार झालेल्या चेन्नई येथील गरुडा एरोस्पस कंपनीच्या किसान ड्रोन चे प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्र माळेगाव बारामती येथे नुकतेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा.श्री. संजीवराजे नाईक निंबाळकर पाहून या अजोड तंत्रज्ञानाचे कौतुक केले या प्रात्यक्षिका वेळी मा.श्री. संजीवराजे यांनी किसान ड्रोन ची संपूर्ण माहिती घेऊन या तंत्रज्ञानाचा वापर ही आधुनिक शेतीची काळाची गरज असून या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पाणी तसेच पैशाची बचत होणार असून महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ड्रोन खरेदी केल्यास 40 % सबसिडी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून समृद्ध व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन धोरणानुसार जिल्ह्यातील सर्व विकास सेवा सोसायट्यांनी गरुडा किसान ड्रोन खरेदी करून शेतकरी सभासदांना योग्य दरात औषध फवारणी करून द्यावी व नवीन व्यवसायात पदार्पण करण्याचे आवाहन केले.

 याप्रसंगी गरुडा एरोस्पेस चेन्नई व कृषी विज्ञान केंद्र माळेगाव बारामती यांचे वतीने सातारा जिल्ह्यातून श्री.विशाल नाळे यांनी रिमोट पायलट चे प्रशिक्षण पूर्ण करून DGCA यांच्यावतीने प्राप्त झालेले प्रमाणपत्र देऊन मा.श्री. संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी श्री.विशाल नाळे यांचा सत्कार केला  व बारावी नंतर नवीन करिअर च्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी  कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे केंद्र शासन मान्यताप्राप्त ड्रोन पायलट प्रशिक्षण घेवून आपले करीयर उज्ज्वल करावे ही अपेक्षा व्यक्त केली व याबद्दल अधिक माहितीसाठी सांगवी ता.फलटण येथील हिंद आय डी सोल्युशन चे मा.श्री. शोएब शेख (8485809114) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

 याप्रसंगी गरुडा एरोस्पेस चे महाराष्ट्र डिस्ट्रीब्यूटर हिंद आयडी सोलुशन चे मा.श्री. शोएब शेख, सातारा जिल्हा डीलर श्री.विशाल नाळे, सोलापूर जिल्हा डीलर सौ.आस्मा मुलाणी मॅडम तसेच पंचक्रोशीतून आलेले बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा