न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण - शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी बुधवार, 4 एप्रिल रोजी जाहीर होणार असल्याचे वृत्त असून या यादीत माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशिल मोहिते-पाटील तुतारी चिन्हाचे उमेदवार असतील का, याची उत्सुकता तमाम माढा माढा वासियांना  लागली आहे.  पवारांकडून यादी जाहीर झाल्यानंतरच माढ्याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

 

काही वर्षांपूर्वी शरद पवारांच्या मूळ राष्ट्रवादीला सोडून मोहिते-पाटील यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले होते. मोहिते-पाटील राष्ट्रवादीत होते तेंव्हा सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. तर २०१४ च्या मोदी लाटेतही माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभेचा गड राष्ट्रवादीसाठी राखला होता. त्यावेळच्या राष्ट्रवादीतील पक्षातंर्गत राजकारणाला वैतागून मोहिते-पाटलांनी राष्ट्रवादी सोडली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे माढ्यातील उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलून

 

भाजपाला राजकीय ताकत दाखवली होती. परंतु खा. निंबाळकर यांना मोहिते पाटील यांच्याशी सलोखा राखण्यात अपयश आले. निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी देवू नये, असा नाराजीचा सूर मोहिते-पाटील यांनी मागील सुमारे दिड ते दोन वर्षांपासून लावला होता. पण भाजपा पक्षश्रेष्ठींनी याकडे दुर्लक्ष करत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी निंबाळकरांनाच पुन्हा उमेदवारी दिली. त्यानंतर मोहिते-पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून अकलूजच्या शिवरत्नवर शक्ती प्रदर्शन देखील केले. भाजपाचे मंत्री गिरीष

महाजन यांनी मोहिते-पाटलांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देखील केला. पण अद्याप तरी मोहिते-पाटलांची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश आले नाही किंवा भाजपाने तसे पुन्हा प्रयत्नही केल्याचे दिसले नाही.

 

दरम्यान शरद राष्ट्रवादीने मोहिते-पाटील यांच्यावर जाळे टाकले असून गुरुवारी जाहीर होणाऱ्या यादीत पवारांकडून मोहिते-पाटील यांच्या हातात तुतारी दिली जाते का हे पाहणे आता औत्सुक्याचे असून ते आता स्पष्ट होणार आहे. जर का तुतारीच्या यादीत जर धैर्यशिल मोहिते-पाटील यांचे नाव नसेल तर मग मोहिते-पाटील काय भूमिका घेणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. माढ्याच्या या निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय समिकरणे देखील बदलणार आहेत.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा