न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

करमाळा -आज करमाळा येथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या रश्मीताई बागल यांच्या समर्थकांची बैठक त्यांच्या निवासस्थानी पार पडली.

यावेळी खासदा रणजीत सिंह नाईक निंबाळकर जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार ,सरचिटणीस गणेश चिवटे , इतर पदाधिकारी उपस्थित होते .यावेळी बोलताना भाजप नेत्या रश्मीताई बागल म्हणाले की माढा लोकसभा मतदारसंघातून विशेषता करमाळा तालुक्यातून आम्ही सर्व महायुतीचे नेते, कार्यकर्ते, एकत्र येऊन मोठ्या मताधिक्याने खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना यावेळी करमाळा तालुक्यातून लीड देणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने भारत हा प्रगतशील देश बनला आहे त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रश्न विशेषता करमाळा तालुक्यातील पाणी प्रश्न रेल्वे, रस्ते हे विषय खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी मार्गी लावले आहेत. त्यामुळे आमच्या तालुक्यातील जनता खासदारांच्या कामावर खुश आहे यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की मला मिळालेल्या संधीतून मतदार संघातील विकासाच्या दृष्टीने सर्व प्रश्न मी मार्गी लावलेली आहेत भविष्यात माढा लोकसभा मतदारसंघ हा देशातील एक विकासाचा मॉडेल म्हणून हा मतदार संघ करणार आहे उर्वरित सर्व प्रश्न पुढील पाच वर्षांमध्ये मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, युवक अध्यक्ष शंभूराजे जगताप, व इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा