न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण - मलवडी ता. फलटण गावचे राष्ट्रवादीचे सरपंच बाजीराव तरडे यांचा व ग्रामपंचायत उपसरपंच ज्ञानदेव टकले व इतर सदस्य व सोसायटी चे चेअरमन नानासो बिचकुले व शशीकांत टकले सदस्य दादा कारंडे, हरिदास तरडे ,आगतराव तरडे, राहुल गायकवाड, सतिश कारंडे, गणेश भोसले, दिपक तरडे ,किरण कारंडे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला यावेळी युवा नेते धनंजय दादा साळुंखे पाटील, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील , किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष सुशांत निंबाळकर , किसान मोर्चाचे अध्यक्ष जयवंत केजळे, तालुका सरचिटणीस संतोष सावंत उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर म्हणाले की मलवडीचे गावांसाठी निधी विकासासाठी कमी पडणार नाही भविष्यात युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच युवकांसाठी लवकरच अद्यावत व्यायाम शाळा उभारणार आहे तसेच गावातील जमीन धो बलकवडी ला जमीन गेली आहे परंतु आजुन शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी सांगितले गावातील कार्यकर्ते नी आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले यावेळी रामभाऊ नरूटे पाटील, धनाजी टकले, बबन रिटे, सचिन बरकडे, विनायक बरकडे, श्रीरग बिचकुले, मारूती सुळ, राजेन्द् रूपनवर महाराज, अनिल तरटे , सचिन बरकडे, उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा