न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

मुंबई - राज्याच्या राजकीय दृष्ट्या केंद्रस्थानी असलेल्या माढा मतदारसंघात रोज नवीन राजकीय घडामोडी घडत असताना काल मुंबई येथे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे माळशिरस तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर यांची बैठक संपन्न झाली.

 यावेळी उत्तमराव जानकर यांनी महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये पिंजून काढन प्रत्येक विधानसभेमध्ये ताकतीने काम करण्याचं वचन देवेंद्र फडणवीस यांना दिले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तमराव जानकर यांना भविष्यात ताकद देण्याचे संकेत दिले. उत्तमराव जानकर ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने तालुक्याच्या विकासासाठी मदत केली जाईल.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा