न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)
Launches new series for two-wheelers

 

            सातारा दि.18 : उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा करिता नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांसाठी एमएच 11-DF (0001 ते 9999) ही मालिका संगणकीय वाहन 4.0 प्रणालीवरती दि. 21 फेब्रुवारी 2022 पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सातारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली आहे.

 

          ज्या वाहन धारंकाना आपल्या वाहनास आकर्षक क्रमांक फी भरुन आरक्षित करावयाचे आहे अशांनी संपर्क साधून फी भरुन आरक्षित करुन ठेवावेत. तसेच दुचाकी मालिकेतील क्रमांक इतर वाहनांसाठी हवा असले तर नियमानुसार तिप्पट फी भरुन नोंदणी क्रमांक देण्यात येईल. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांच्याशी संपर्क साधावा.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा