न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण - सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देऊन कृषी उद्योगात परिवर्तनात्मक व शाश्वत बदल घडवून आणण्याच्या के. बी. एक्सपोर्ट व के. बी. बायो ऑरगॅनिक कंपनीचे ध्येय आणि त्याच्या यशस्वीते साठी घेतलेल्या मेहनतीचे महाराष्ट्र शासन कृषी खात्यांतर्गत गुण नियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

       महाराष्ट्र शासन कृषी खात्यांतर्गत गुण नियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमने के. बी. बायो ऑरगॅनिक आणि के. बी. एक्सपोर्ट कंपनी कॅम्पसला भेट दिली. या भेटी दरम्यान कंपनीचे संचालक सचिन यादव यांच्या समवेत त्यांनी कंपनीच्या सर्व युनिट्सची पाहणी केली यामध्ये सर्व प्रयोगशाळा व त्या अंतर्गत चालणारे काम तसेच संशोधन प्रक्रियेमध्ये कंपनीने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.

       के. बी. कंपनीच्या संशोधन व विकास विभागाचे कार्य पाहुन अतिशय प्रभावीत झाल्याची भावना व्यक्त करीत कंपनीचे संचालक सचिन यादव यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी संचालक विकास पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

     यावेळी कंपनीचे संचालक सचिन यादव यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

 

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा