न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)
If I go, I will take this to you my nadi do not apply - Shrimant Ramraje Naik Nimbalkar

फलटण -खासदार व माणचे आमदार यांना सध्या एकच काम आहे की माझ्या वर केस कशी करायची पण मी गेलो तर तुम्हाला ही घेऊन जाईन माझ्या नादी लागू नका असा इशारा विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांना दिला.

 

 चौधरवाडी ता,फलटण येथील जलजीवन मिशन योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात रामराजे बोलत होते, आमदार दीपक चव्हाण, माजी सभापती शंकरराव माडकर,रेश्माताई भोसले, माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले, हनुमंतराव चौधरी,श्रीराम कारखाना व्हा,चेअरमन नितीनराव भोसले,,पंचायत समिती सदस्य बाळासाहेब ठोबरे, शरदराव रणवरे,यांच्या सह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी बोलताना रामराजे पुढे म्हणाले गेली तीस वर्ष तालुक्यात सर्वांगीण विकास केलेला असून खासदारांना करायला कामच उरलेले नाही, त्यांनी दिल्ली ला जावं व जाताना माणच्या आमदार यांना ही घेऊन जावे त्या शिवाय महाराष्ट्र शांत रहाणार नाही, प्रशासन वेठीस धरून दमबाजी व शिव्या देण्याचे उद्योग सध्या सुरू असून गेले तीस वर्षे विकासाकडे नेलेला तालुका गावगुंडाच्या हातात कदापी ही जाऊ देणार नाही.

असे सांगून प्रशासनातील शेवटच्या घटकाला ग्रामसेवक यांना ही यांची दमबाजी सुरू असून संस्कृत मोदी यांना ही बिघडविण्याचे काम जिल्ह्यातील ही दोन जणांची टोळी करत आहे, ( खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी विररपन हे तर जयकुमार गोरे यांना कट्अप्पा असे संबोधित केले ) जलजीवन मिशनच्या योजने बाबतीत बोलताना रामराजे म्हणाले ही योजना जरी केंद्र सरकार ची असली तरी या मध्ये पन्नास टक्के वाटा राज्याचा असून तालुक्यातील सर्व योजना मागील सरकार च्या काळातील असून तत्कालीन व सध्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्या काळात योजना मंजुरी चे आदेश दिले होते, सरकार बदलले तरी माझे सरकार मध्ये पूर्वी इतकेच वजन असून जलजीवन योजना म्हणजे काय हेही माहिती खासदार यांना नाही, उत्तर कोरेगाव मध्ये ओद्योगिक वसाहतीचे कॉरिडॉर मंजुरी ला आपणास यश आलेले असून या दोघांना सध्या माझ्या वर केस कशी करायची इतकेच काम उरलेले आहे असे सांगितले, या प्रसंगी आमदार दीपकराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले, प्रस्थाविक सरपंच प्रतिभा चौधरी यांनी केले, स्वागत उपसरपंच विजय गोफने यांनी मानले, कार्यक्रमास उत्तमराव चौधरी,ग्रामविकास अधिकारी डी एस भोसले, तात्यासाहेब धायगुडे, शंकरराव बर्गे, मनोहर गिरमे,तुकाराम कोकाटे,सूर्यकांत धायगुडे, किरण शेंडगे, राजेंद्र धुमाळ,अशोक शिर्के,ठेकेदार आर एस माने,पी एस आय विक्रांत शिंदे,यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते,

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा