न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

साखरवाडी प्रतिनिधी ( किसन भोसले ) पिंपळवाडी साखरवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात संत तुकाराम बीज साजरी करण्यात आली विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात तुकाराम बीजेच्या निमित्ताने भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात येऊन तुकाराम महाराजांच्या प्रतिमेची उद्योजक संजय भोसले यांच्या हस्ते महाआरती घेण्यात आली यावेळी मंदिराचा संपूर्ण परिसर टाळ मृदंगाच्या आवाजात दणाणून गेला होता पिंपळवाडीतील श्री योगीराज गुणानाथ साधू महाराजांच्या समाधी स्थळावर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दरवर्षी येणाऱ्या तिथीप्रमाणे एकादशी पौर्णिमा साधू संतांच्या जयंत्या हरिनाम सप्ताह ,काकडा, त्रिपुरा पौर्णिमा, हरी जागर, भजन, कीर्तन, महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते मंदिर समितीच्या वतीने हे सर्व कार्यक्रम आयोजित केले जातात यावेळी तुकाराम बीजेच्या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा