न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण : रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी निश्चित झाले नंतर भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेशास सुरुवात. 

आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फलटण तालुक्यातील पश्चिम भागातील तरडगावचे बागायतदार व माजी सरपंच पांडुरंग विष्णू शिंदे व माजी उपसरपंच राहुल गायकवाड यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

       निरा-देवघर, धोम-बलकवडी प्रकल्पाच्या कालव्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात खासदार साहेबांना यश आल्याने पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागुण तालुक्याचे दुष्काळी परिस्थिती संपणार आहे.

धोम बलकवडी चा कॅनॉल बाराही महिने चालू होणार असून त्याचे काम सुरू झाले आहे. फलटणच्या दुष्काळी भागाला हे वरदान ठरणार असुन नुकतेच काळज पासून माळशिरस तालुक्यापर्यंत कामाचे टेंडर निघाले असून तेही काम आता मार्गी लागणार आहे. 

       या प्रवेशावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी मंचावर धनंजय साळुंखे पाटील, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, प्रभारी सचिन कांबळे पाटील, पूर्व मंडल अध्यक्ष बजरंग नाना गावडे, पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते, शहराध्यक्ष अनुप शहा, अतुल गायकवाड, सिराज शेख, झुंजार, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा