न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

पंढरपूरः संस्थेच्या वतीने आज संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे संचालक मंडळ पदग्रहण समारंभ श्रीराम मंगल कार्यालय येथे आयोजित केला होता.

 

नूतन अध्यक्ष म्हणून श्री.नमन धर्मेंद्र गांधी (पंढरपूर), उपाध्यक्ष श्री.तेजस प्रितम गांधी (अकलूज), सचिव श्री.अमोल श्रीकांत दोशी गुणवरेकर (मुंबई), सहसचिव श्री.तीर्थंकर णमोकर दोशी (भिगवण), खजिनदार श्री.रत्नकुमार राजकुमार फडे (अकलूज), सहखजिनदार श्री. आकाश मनोज गांधी (करमाळा), प्रसिद्धीप्रमुख श्री.देशभूषण भारत रणदिवे (वैराग), सहप्रसिद्धीप्रमुख श्री. अरिहंत सुनील फडे (श्रीपूर) यांची निवड करण्यात आली .

 

यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष यांच्या हस्ते भगवान महावीरांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. 

भगवान महावीरांच्या प्रतिमेस माल्यार्पण रसिकभाई कोठडिया, राजेश शहा, मरवडेकर, शाम पाटील, अतुल गांधी यांनी केले. 

 

दीपवज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.लक्ष्मण आसबे, सी.ए.शशील गांधी,धर्मेंद्र गांधी, डॉ. शितल फडे, राजकुमार गांधी, डॉ . सुर्यकांत दोशी, संतोष फडे यांनी केले.

 

सुमनश्री महिला मंडळ, पंढरपूर यांनी मंगलाचरण करुन उपस्थितांना मंत्रमुघ्द केले.

 

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिहीरभाई गांधी प्रास्ताविकातून संस्थेमार्फत करण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. संस्थेच्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला.

 

यावर्षीच्या पदग्रहण समारंभाचे वैशिष्ठ होते ते आयोजित केलेले व्याख्यान डॉ.लक्ष्मण आसबे यांनी जागर समृद्धीचा या विषयावर आपले विचार मांडले. ते बोलताना म्हणाले की एखाद्या व्यक्तीने सर्वांगीण विकास केला तर तो माणूस समृद्ध मनुष्य असतो. माणूस म्हणून जन्माला येण आणि मरताना देव म्हणून जाण्याची अनुभूती सर्वश्रेष्ठ व्यक्ती घडवते. धर्म, वारकरी परंपरा, चाणक्य नीति या माध्यमातून त्यांनी प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतला. मानवी जीवनात असणाऱ्या चार आश्रमाबद्दल बोलत असताना त्यानी कश्या पद्धतीने काम केले पाहिजे याबद्दल देखील सुंदर वर्णन सांगितले. प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणार व्याख्यान त्यानी यावेळी केलं.

 

  सी.ए.शशील गांधी यांनी ऑनलाईनचे मृगजळ या विषयावर अभ्यासपूर्ण विचार मांडले. ऑनलाइनची सुरुवात कशी झाली यापासून ते ऑनलाइन व्यवहाराचे तोटे उपस्थितांना समजाऊन सांगितले. शेअर मार्केट कशा पध्दतीने काम करते. त्याचे फायदे कशा पद्धतीने होऊ शकतात यावर मार्गदर्शन त्यांनी केले. 

 

मावळते अध्यक्ष प्रा.मनीष शहा यांनी २०२३-२४ या वर्षात संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा वाचून दाखवला.

 

मिहीरभाई गांधी यांनी यावेळी नवनियुक्त संचालक मंडळास शपथ दिली. सातही जिल्ह्यामधून ४६ नूतन संचालकांनी शपथ घेतली. अरिहंत, देव, गुरु, शास्त्र यांच्या साक्षीने शपथ देण्यात आली. संस्थेचे कार्य मनापासून करुन तन-मन-धनाने सर्व कार्यात सहभागी होऊन जिनधर्माची प्रभावना करण्याची शपथ दिली.नुतन संचालक मंडळात फलटण मधून पलाश दोशी गुणवरेक्कर, सिद्धेश शहा व मयूर शहा यांची निवड करण्यात आली. फलटण मधून बहुसंख्येने सभासद नोंदणी करण्यास प्रितम कोठारी, निलेश दोशी, यशराज गांधी यांनी प्रयत्न केले.

 

माजी संचालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन करण्यात आला.आला.सन २०२३-२४ मध्ये फलटण मधून निलेश दोशी, प्रमोद शहा, मयूर शहा व राहुल शहा हे संचालक पदी होते.

 

या कार्यक्रमास डॉ. सतीश दोशी, अनिल जमगे, किरण शहा, दीपक व्होरा, राजकुमार गांधी, श्रीमती ताई शहा, डॉ.श्रेणिक शहा, हुकूमचंद दोशी, अजित माणिकशेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंढरपूर येथील कार्यकर्ते रोहित चंकेश्वरा, अगध गांधी व सहकारी यांनी कार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश कासार यांनी केले.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा