न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

 

फलटण -  - मूळचे मठाचीवाडी (शेरेवस्ती) ता. फलटण येथील भूमिपुत्र व सध्या घाटकोपर मुंबई येथे स्थायिक असलेले डॉक्टर गणपत सावंत यांची इंडियन मेडीकल असोसिएशन (NEBS) च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचे असे हे पद आहे. घाटकोपर मुंबई येथे स्वतःचे सुसज्ज असे नोबेल प्लस नावाने अत्याधुनिक सोईने युक्त हॉस्पिटल उभारून घाटकोपर परिसरात प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे. डॉ सावंत यांचे वैद्यकीय शिक्षण M.D., D.G.O., F.C.P.S., D.F.P D.I.C.O.G., (Bom), D.N.B(INDIA)

Diploma In Gynaecological Endoscopy- Germany 

Obstetrician Gynaecologist Infertillity Specialist &Endoscopist असे झाले असून त्यांनी डी वाय पाटील मेडिकल कॉलेज नेरुळ नवी मुंबई येथे प्रोफेसर व विभाग प्रमुख म्हणून काम केले आहे. कोहिनुर हॉस्पिटल येथे कन्सल्टंटन्ट म्हणून कार्यरत होते तर यापूर्वी त्यांनी घाटकोपर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे 

 IMA (NEBS) मावळते अध्यक्ष डॉ परेश पटेल यांचेकडून आज डॉ नंदिता पाळशेतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते डॉ गणपत सावंत यांनी अध्यक्षपदाची सूत्रे घाटकोपर येथील लव्हेंडर बो या आलिशान हॉटेलात समारंभपूर्वक स्वीकारली.

यावेळी सेक्रेटरीपदी निवड झालेले डॉ कल्पेश शहा व खजिनदारपदी निवड झालेले डॉ विवेक रणदिवे यांचा असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 डॉक्टर गणपत सावंत यांनी मठाचीवाडी (शेरेवस्ती) सारख्या ग्रामीण भागातून येऊन प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी कुटुंबातून असताना खडतर शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात गरुडभरारी घेतली आहे.

 कार्यक्रमास असोसिएशनचे सर्व मा अध्यक्ष आजी माजी सन्मानीय सदस्य शहरातील प्रख्यात डॉक्टर्स मित्र मंडळी नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते

 डॉ नेहा शहा व डॉ केतन पाखले यांनी सूत्रसंचालन तर स्वागत डॉ संगीता सावंत डॉ रौनक सावंत डॉ गौरवी भापकर प्रणील भापकर यांनी स्वागत केले.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा