न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

जेष्ठ किर्तनकार व समाजसेवक ह.भ.प. शामराव जगदाळे (तात्या) अनंतात विलीन 

 

आतां माझे नका वाणूं गुण दोष । करितों उपदेश याचा कांहीं ।।१।।

मानदंभासाठी छळीतसें कोणा । आण या चरणां विठोबाची ।।२।।

तुका म्हणें हें तों ठावें पांडुरंगा । काय कळे जगा अंतरींचें

      या तुकोबांरायांच्या अभंगाप्रमाणे आपली दिनचर्या असलेले 

मोगराळे (ता.माण ) गावचे जेष्ठ नागरिक तथा माजी सरपंच कै. ह.भ.प शामराव धोंडीबा जगदाळे यांनी तुकाराम बीजचे औचित्य साधून पंच‌माभूतान आपली प्राणज्योत विलिन केली. शामराव हे इंचगिरी रसाळ सांप्रदाय उपासक, साधक होते. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल शामराव जगदाळे यांनी मुंबईत सुतगिरणी मध्ये हमालीचे काम केले , १९७२ साली त्यांना शंकर महाराज रसाळ या सतपुरुषाचा स्पर्श झाला . तात्यांना परमार्थिक वसा लाभला ते कामगारांचे लिडर झाले. मोगराळे गावचे सरपंच झाले . या काळात त्यांनी शासकीय शाळा इमारती , घरकूल योजना, महिलांना गृहउद्योग अशी अनेक विकासाची कामे केली . समर्थ शंकर महाराज यांच्या कृपाभाशिर्वादाने प्रवचन, किर्तने करू लागले . अनेक मित्रांना व्यसनमुक्त केले. यामुळे सांप्रदयात त्यांची आदर्श प्रतिमा तयार झाली. त्यांच्या अचानक जाण्याने अभ्यासु व कायम पाठीवर मायेचा हात असलेले व्यक्तीमत्व हरपल्याची भावना जनसामान्यात तयार झाली आहे. सांप्रदयाचे कोकण सचिन ह.भ.प कृष्णा महाराज यांनी त्यांच्या परिवाराचे सांतवण केले . जगदाळे यांचे मुहुर्तावर जाणे हा मोक्षाचा मार्ग आहे ,रोज प्रवचन किर्तन हीच खरी श्रद्धाजली असल्याचे त्यांनी सांगितले.

   कै. जगदाळे महाराजांच्या अंतयात्रेला संप्रादयाचे मठाधीश पांडुरंग महाराज रसाळ , वेदाचार्य दिनानंद स्वामी , ह.भ.प तुकाराम महाराज रसाळ यांचेसह संप्रादायिक, सामाजिक व राजकीय मंडळींसह पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

 

त्यांच्या पश्यात. १ मुलगा, ३ मुली , पत्नी , नातवंडे असा परिवार आहे. 

 

दशक्रिया विधी ५/४/२०२4 रोजी मोगराळे येथे राहत्या घरी होईल.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा