न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण दि. १२ : श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण यांना महाराष्ट्र शासन समाजकल्याण विभागाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने मुंबईतील शानदार सोहळ्यात आज (मंगळवारी) सन्मानित करण्यात आले.

   २५ हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

        संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके आणि सोसायटी नियामक मंडळ सदस्या सौ. ज्योतीताई सचिन सूर्यवंशी बेडके यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडून हा पुरस्कार सन्मानपूर्वक स्वीकारला, त्यावेळी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्यासह अन्य मंत्रीगण व अधिकारी उपस्थित होते.

       समाजकल्याण क्षेत्रात मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय व अंधश्रद्धा निर्मुलन, जनजागरण वगैरे क्षेत्रातील गेल्या १० वर्षांहुन अधिककाळ कार्यरत असलेल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या कामाची दखल घेऊन त्यांची सन २०२२ - २३ या वर्षातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून आज प्रत्यक्ष या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

    श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल विविध स्तरावरुन संस्थेचे अभिनंदन होत आहे.

 

 

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा