न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

 

फलटण  : संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना सोहळ्याच्या तरडगाव येथील मुक्कामा दरम्यान मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारे नकाशा तयार करुन क्यू आर कोड द्वारे त्याच्या वापराची अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणून वारकऱ्यांना वापराची संधी दिल्याबद्दल नुकताच इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तरडगाव येथील सुजल चंद्रकांत चिरमे या विद्यार्थ्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले, उप जिल्हाधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार अभिजित जाधव यांनी कौतुक करुन त्याला पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

      सध्याच्या मोबाईल सुविधेचा योग्य वापर करुन वारीतील भाविकांना पालखी तळ मदत केंद्र, प्रा. आरोग्य केंद्र, एस. टी. स्टँड, आपत्कालीन नियंत्रण कक्ष, शौचालय सुविधा, गॅस, पाणी, मोबाईल रिचार्ज केंद्र, चांदोबाचा लिंब आणि पेट्रोल पंप येथे पोहोचण्यासाठी कोठेही विचारणा न करता आपल्याला पाहिजे असलेले ठिकाणचा क्यु आर कोड ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या नकाशावर स्कॅन केल्यानंतर सदर मोबाईल वर येणारा मार्गदर्शक नकाशा तुम्हाला त्या ठिकाण पर्यंत घेऊन जाईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

    या अनोख्या सुविधेबद्दल अनेकांनी तरडगाव ग्रामपंचायत आणि सुजल चिरमे यांचे कौतुक केले आहे.

 

फोटो : प्रांताधिकारी सचिन ढोले, उप जिल्हाधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, चंद्रकांत चिरमे यांच्या समवेत क्यू आर कोड नकाशा व त्याचा निर्माता सुजल चिरमे.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा