न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

मिरढे (भाऊसो निकम )

मिरढे तालुका फलटण येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजेगटाचे भीमराव सिध्दु कचरे यांची ७ विरुद्ध २ मताने बहुमताने निवड करण्यात आली.

               येथील सरपंच सौ. सविता पोकळे यांनी आपला ठरलेला कालावधी पुर्ण झाल्याने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदी भीमराव कचरे यांची बहुमताने निवड करण्यात आली.

 

                      निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी ज्ञानेश्वर सोनवलकर यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेविका वैशाली सोनवणे पोलीस पाटील किसनराव काशीद यांनी सहकार्य केले.

             यावेळी बैठकीस माजी सरपंच नामदेव काळे, सविता पोकळे, उपसरपंच संगीता यादव, सदस्य नवनाथ यादव, कुंडलिक चव्हाण, मोनाली शेंडगे, रूपाली मदने, साधना जगताप यांची उपस्थिती होती.

       नवनिर्वाचित सरपंच भीमराव कचरे यांचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, माजी सरपंच नामदेव काळे आदिंसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा