न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)
Diagnostic at low door to the poor, needy, low income group citizens of Phaltan taluka Establishment of Center - Anil Sheth Mohatkar

फलटण प्रतिनिधी:-मॅग फिनिसर्व्ह कं. लि.फलटण आणि मॅग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.फलटण यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नुकतेच मॅग फाऊंडेशन या चॅरिटेबल संस्थेची स्थापना करून फलटण तालुक्यातील गरीब, गरजू , अल्प उत्त्पन्न गटातील आणि जेष्ठ नागरिकांचा वैद्यकीय आर्थिक भार कमी करण्यासाठी वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या मुंबई येथील माऊली फाउंडेशन काळबादेवी मुंबई या सामाजिक संस्थेबरोबर जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.  

 

योग्य आणि अचूक रोगाचे निदान हे उपचारासाठी अत्यावश्यक असून ते सामान्यांना कमी खर्चात उपलब्ध करून देण्यासाठी "जनसेवा हीच ईश्वर सेवा" हे ब्रीद वाक्य घेऊन अत्यंत आधुनिक आणि सुसज्ज मशीनरी आणि तज्ञ डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली स्वरा हाईट्स दुसरा मजला रिंग रोड फलटण येथे सुसज्य अशा प्रकरचे जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर उभारण्यात आले आहे. 

 

मॅग आणि माऊली फाऊंडेशन संचलित जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर उदघाटन समारंभ येत्या रविवारी दिनांक २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,थोर शिक्षणतज्ञ सर मा.डॉ.मो.स. गोसावी,सेक्रेटरी गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण चेअरमन.मा.श्रीमंत.रघुनाथराजे नाईक निंबाळकर,यांच्या शुभहस्ते महाराजा मंगल कार्यालय फलटण येथे संपन्न होत आहे.

 

या उदघाटन समारंभास विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलचे अध्यक्ष सुप्रसिद्ध डॉ. श्री. शिवकुमार उत्तुरे,इंडियन मेडिकल कॉऊन्सिलचे माजी उपाध्यक्ष डॉ.श्री.अनिल पाचणेकर,रहेजा आणि फोर्टिस हॉस्पिटलचे प्रमुख पॅथोलोसिस्ट डॉ.श्री.सुरेंद्र शिंगणापूरकर,उपधर्मादाय आयुक्त श्री.नवनाथ जगताप साहेब ,माउली फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.एच.एस.शिंगण,फलटण नगरीतील सेवाभावी डॉ.श्री.शरद पोरे आणि जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत. 

 

जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर या सेवाभावी उपक्रमा अंतर्गत सर्वप्रथम पॅथॉजिकल विभाग सुरु केला जाणार असून डॉ. सौ. दिव्या रसाळ एम.डी. पॅथालॉजिस्ट या विभागाची सेवा पाहणार आहेत.या डायग्नोस्टिक सेंटरच्या बोर्ड ऑफ ऍडव्हजरीवर डॉ.उत्तुरे,डॉ.पासणेकर , डॉ. शिंगणापूरकर,डॉ पोरे,डॉ.शिंगण,श्री. नवनाथ जगताप आणि श्री.बलभीम खोमणे साहेब माजी आयुक्त अन्न आणि औषध यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.

 

 

जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील पिवळे,केशरी शिधाधारक,60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि मॅग आणि माऊली फाउंडेशनचे सभासद यांना 50% सवलतीच्या दराने सर्व पॅथॉलॉजिच्या सेवा दिल्या जाणार आहेत. तसेच जेष्ठ नागरिक आणि आजारी रुग्णांना नाममात्र फी आकारून घरपोच सेवा उपलब्ध केली जाणार आहे. त्यासाठी 24 तास अगोदर (संध्याकाळी 5.00 वाजे पर्यंत )सेंटरच्या.9529233067 नंबरवर फोन करून नोंदणी केल्यास रक्तलघवीचे नमुने घरी येऊन घेतले जातील आणि रिपोर्ट व्हॉट्सअपवर / ईमेल द्वारे डिजिटल स्वरूपात दिले जाणार आहेत. 

 

 

वेळीच अचूक निदान झाल्यास आणि आरोग्यविषयक तपासण्या केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या टाळता येत असल्याने नागरिकांना हेल्थकार्ड दिले जाणार असून नागरिकांच्या रिपोर्टचे वर्गीकरण करून त्यांना योग्य आहार आणि व्यायाम इत्यादी सल्ले तज्ज्ञांकडून दिले जाणार आहेत. 

 

या जनसेवी उपक्रमाचा लाभ फलटण तालुक्यातील गरजूंनी घ्यावा आणि उद्घाटन समारंभास उपस्थित राहावे अशी विनंती अनिलशेठ मोहटकर अध्य मॅग फाउंडेशन फलटण व ऍड. विश्वनाथ टाळकुटे,कार्याध्यक्ष माऊली फाऊंडेशन,काळबादेवी.मुंबई यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा