न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

फलटण - सातारा जिल्हा पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या माध्यमातुन फलटण तालुका शिवसेनेला विविध विकास कामांच्या माध्यमातुन तब्बल ७६ लाख रुपयांचे विकास कामे मंजुर करुन तालुक्यात शिवसेनेला पाठबळ दिल्याची माहिती फलटण तालुका शिवसेनाप्रमुख पिंटू उर्फ नानासो इवरे यांनी दिली.

 

मा.ना.मुख्यमंत्री श्री.एकनाथरावजी शिंदे महाराष्ट्र राज्य यांच्या धोरणानुसार फलटण तालुका शिवसेना यांच्या मागणीनुसार फलटण तालुक्यात विविध विकास कामे मंजुर करून तालुक्यातील शिवसेनेला ताकद दिली असल्याचे पिंटू इवरे यांनी सांगितले

पालकमंत्री शंभुराजे देसाई यांनी खालील विकास कामांना मंजुरी दिली. 

१) ३०५४ अंतर्गत मठाचीवाडी कारांडे वस्ती ते चव्हाण वस्ती ग्रा.मा.१०९ रस्ता सुधारणा करणे रक्कम २० लक्ष

२) विशेष घटक योजना अंतर्गत मौजे टाकळवाडे येथे मागासवर्गीय वस्तीत आभ्यासिका बांधकाम करणे रक्कम१८ लक्ष

३)बाळासाहेब ठाकरे योजने अंतर्गत टाकळवाडे ग्रामपंचायत इमारत बांधने रक्कम २० लक्ष रुपये

४)जिल्हा नियोजन अंतर्गत राजाळे भोकरे डि.पी शेजारी नवीन विद्युत डि.पी बसवने रक्कम १० लक्ष रुपये

५)टाकळवाडे येथे जनसुविधा अंतर्गत स्माशनभुमी सुधारणा करणे रक्कम ४ लक्ष रुपये

६)निंबळक येथे जनसुविधा अंतर्गत स्माशनभुमी सुधारणा करणे रक्कम ४ लक्ष रुपये

वरील सर्व कामाना पालकमंत्री महोदय यांनी विविध योजने अंतर्गत मंजुरी दिलेली असुन पुढील काळात तालुक्यातील विविध भरीव निधी देणार असल्याचे मंत्री महोदयांनी विश्वास दिला आहे अशी माहिती तालुकाप्रमुख श्री.नानासो उर्फ पिंटुशेठ इवरे यांनी दिली

या सर्व कामाना मंजुरी देण्यासाठी संपर्क प्रमुख श्री.शरदरावजी कणसे साहेब व जिल्हा प्रमुख सातारा नियोजन सदस्य श्री.चंद्रकांत (दादा) जाधव यांनी पाठपुरावा केला.

या सर्व विकासकामाना निधी मिळवुन देले बद्दल शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री.अविनाश फडतरे,तालुकाप्रमुख श्री.नानासो उर्फ पिंटुशेठ इवरे.,श्री.ज्ञानेश्वर पवार,श्री.हेमंत सुतार, शहरप्रमुख श्री.निलेश तेलखडे,संजय अहिवळे, तसेच अभिजीत भोसले,जयदिप गुंजवटे,सचिन जाधव इत्यादी पदाधिकार्यानी आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा