न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

                          फलटण दि.--संत नामदेव महिला मंडळा च्या वतीने फलटण च्या  शिंपी समाजातील महिला साठी   विविध  स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी  मा. सुभद्राराजे नाईक निंबाळकर , सुपर्णा अहीवळे, सारिका शहाणे, सोनवलकर मॅडम,ला. सुनंदा भोसले निर्भया पथकाच्या वैभवी भोसले,संध्या वलेकर,निशा गांधी,सीमा माने,महिला मंडळाच्या अध्यक्षा पद्मा टाळकुटे,उपाध्यक्ष अंजली कुमठेकर,खजिनदार अश्विनी हेंद्रे व सदस्य  मान्यवर म्हणून उपस्थित होत्या.
     श्रीमंत सुभद्राराजे पुढे म्हणाल्या गेले अनेक दिवस शिंपी समाजातील महिलांचे विविध सामाजिक उपक्रम महिलांना प्रेरणा देणारे असून त्यामुळे समाजातील महिलांचा एकोपा वाढविणारे दिसून येत आहे यातच मंडळाच्या पदाधिकारी यांचे यश सामावले गेले आहे,यापुढेही समाजातील महिलांनी वेळोवेळी आपली उपस्थिती दाखवून सामाजिक कार्य पुढे वाढविण्याचे आवाहन श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
 संत नामदेव शिंपी समाज महिला मंडळातर्फे  13,14,15 मार्च रोजी  महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये रांगोळी स्पर्धा,पारंपरिक ठिपक्याची रांगोळी, स्ट्रॉ व टिकली स्पर्धा,नामदेवांच्या जीवन चरित्रावर वक्तृत्व स्पर्धा , पिठातून नाणे शोधणे,विविध वेशभुषा,पालेभाज्या व  पौष्टिक पदार्थ बनवणे अशा विविध मनोरंजक आणि महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्या स्पर्धा चे निकाल पुढीलप्रमाणे * रांगोळी स्पर्धा- प्रथम क्रमांक - सौ रुपाली टाळकुटे ,द्वितीय क्रमांक - प्रियांका टाळकुटे ,तृतीय क्रमांक- मंजुषा टाळकुटे, चतुर्थ  क्रमांक-  सोनाली जामदार, * स्ट्रॉ टिकली स्पर्धा- प्रथम क्रमांक- अश्विनी मोहटकर,द्वितीय क्रमांक-  प्रियांका पोरे, तृतीय क्रमांक-  किशोरी कुमठेकर ,चतुर्थ क्रमांक - हेमांगी गानबोटे .* वक्तृत्व स्पर्धा-प्रथम क्रमांक- सुलभा मोहटकर द्वितीय क्रमांक- रेखा हेंद्रे , तृतीय क्रमांक- हेमांगी गानबोटे ,चतुर्थ क्रमांक- प्रियंका टाळकुटे .* पाककृती स्पर्धा - प्रथम क्रमांक -वंदना पोरे द्वितीय क्रमांक -स्वाती गाटे ,तृतीय क्रमांक- प्रज्ञा भांबुरे,चतुर्थ क्रमांक- अंजली कुमठेकर, *पिठात नाणी शोधणे- प्रथम क्रमांक - विजेता गानबोटे , द्वितीय क्रमांक-  गीता भांबुरे,तृतीय क्रमांक- कल्पना टाळकुटे, चतुर्थ क्रमांक- मंजुषा टाळकुटे * पारंपारिक वेशभूषा स्पर्धा - प्रथम क्रमांक- सुलभा मोहटकर, द्वितीय क्रमांक- प्रियांका टाळकुटे, तृतीय क्रमांक- मंगल काकडे, चतुर्थ क्रमांक- किशोरी कुमठेकर यांचा विविध भेट वस्तू व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
            याप्रसंगी मंदिरात सेवा देणाऱ्या सेविका सुरेखा यांचा साडी देऊन सत्कार करण्यात आला . नेहमी सहकार्य करणाऱ्या व्यक्ती म्हणून रेखा हेंद्रे, संजय जामदार, वैष्णवी उंडाळे, वसुधा भांबुरे यांचा गुलाबाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महिला मंडळाचे अध्यक्ष पद्मा टाळकुटे, उपाध्यक्ष अंजली कुमठेकर खजिनदार अश्विनी हेंद्रे यांचा विशेष सत्कार. रूपाली टाळकुटे यांनी केला तसेच  धनश्री पोरे व प्रियांका पोरे यांनीही  सर्वांचा यथोचित सत्कार करून अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आणि सूत्रसंचालक रेखा हेंद्रे यांचे व उपस्थितांचे आभार मानले.प्रारंभी श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर व उपस्थित मान्यवर यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा हेंद्रे यांनी केले.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा