न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)
Zirapwadi, Tal. Dashrath Phule files public interest litigation in Mumbai High Court to start medical services in old rural hospital building at Phaltan

फलटण -: फलटण शहर व तालुक्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी रुग्णसंख्येला वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी गिरवी रोडवरील, झिरपवाडी, ता. फलटण येथील जुन्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत दुरुस्त करुन घेऊन त्याचा वापर कोरोना उपचार केंद्रासाठी त्वरित वापर करावा तसेच ही इमारत वैद्यकीय सेवा सुविधांसाठी कायम वापरात आणावी या मागणी साठी महाराष्ट्र शासन व विशेषतः आरोग्य विभागाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 

     सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले आणि सदर रुग्णालय परिसरसतील ग्रामस्थांच्यावतीने दाखल करण्यात आली असून याची सुनावनी मुख्य न्यायाधीशाच्या समोर होणार आहे. याचिका कर्ते यांच्यावतीने अँड . सतीश राऊत काम पहात आहेत. 

        फलटण शहरालागत गिरवी रोडवर, झिरपवाडी ग्रामपंंचायत हद्दीत ३० ते ३५ वर्षापूर्वी ८ ते १० एकर जागेत लाखो रुपये खर्च करुन शासनाने सदर रुग्णालय उभारले, त्यावेळी सुसज्ज इमारत, आवश्यक वैद्यकीय साधने, सुविधा आणि पुरेसा अधिकारी/कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला असूनही रुग्णालय प्रत्यक्ष सुरु झाले नसल्याच्या त्यावेळच्या पार्श्वभूमीवर सन १९९७ मध्ये तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर फलटण येथे आले असता सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना ग्रामीण रुग्णालयाची शहर व तालुक्यातील सर्वसामान्यांना गरज आहे, त्यासाठी रुग्णालय उभे करुन सर्व साधने सुविधा अगदी आवश्यक डॉक्टर्स व अन्य अधिकारी कर्मचारी नियुक्त करुनही सदर रुग्णालय सुरु करण्यात येत नसल्याचे निदर्शनास आणून देत ते तातडीने सुरु करण्याबाबत संबंधीतांना सूचना देण्याची विनंती केली होती, त्यानंतर सदर ग्रामीण रुग्णालय सुरु झाले मात्र ते पूर्ण क्षमतेने कधीही सुरु करण्यात आले नाही आणि अखेर बंद करण्यात आले.

     आज या ग्रामीण रूग्णालयाच्या इमारत दुरुस्तीसाठी सुमारे २ ते अडीच कोटी रुपये खर्च येणार असून जर रुग्णालय बंद पडले नसते तर ही वेळ शासनावर आली नसती, 

करोनाची पहिली लाट सुरु झाले नंतर हे ग्रामीण रुग्णालय सुरु करावे यासाठी पुन्हा मागणी करण्यात आली, त्यावेळी झिरपवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत भागीदारी त्तत्वावर संसर्गजन्य आजारासाठी रुग्णालय उभारण्याबात विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. ७ सप्टेंबर २०२० चे दरम्यान मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय झाला आहे. या बैठकीस आरोग्य मंत्री राजेश टोपे, आ. दिपकराव चव्हाण शासकीयअधिकारी उपस्थित होते. परंतू एक वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी त्याच्या कार्यवाही बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला दिसून येत नाही. त्या दरम्यान सातारा येथे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठक उपमुख्यामंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न लाऊन धरला त्यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना हे रुग्णालय सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत असा आदेश देण्यात आला आता त्यालाही ६ महिन्यांचा कालावधी होऊन गेला तरी कसलीही हलचाल झालेली नाही.

त्यानंतर दि. १० एप्रिल ते दि. १५ ऑगस्ट २०२१ दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यंमत्री, आरोग्य मंत्री व संबंधीत शासकीय यंत्रणांना निवेदने, मागणी पत्रे वगैरे जवळ पास अडीचशे पत्र पाठविली, दि. १५ ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला परंतू अंदाजपत्रक आणि या कार्यालयाकडून त्या कार्यालया कडे पत्र व्यवहराव्यतिरिक्त कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागली असल्याचे दशरथ फुले यांनी सांगितले. 

       कोरोना दुसऱ्या लाटेत फलटण शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकांना वैद्यकीय सुविधा वेळेत मिळाल्या नाहीत परिणामी आपल्या प्राणास मुकावे लागले आहे.

        फलटण शहर व परिसरातील वैद्यकीय सेवा सुविधा पुरेशा नसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सदर ग्रामीण रुग्णालय इमारतीची तातडीने दुरुस्ती करुन घेऊन तेथे कोरोना उपचार केंद्र तातडीने उभे करण्याची आवश्यकता होती मात्र गेले एक ते दिड वर्षे केवळ त्याच्या दुरुस्ती देखभालीचे आराखडे, अंदाजपत्रक करण्यात येत असल्याचे सांगून सदर इमारत पुन्हा एकदा दुर्लक्षीत ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका व्यक्त करीत सदर इमारतीसाठी करण्यात आलेले आराखडे, अंदाजपत्रक तातडीने मंजूर करुन सदर इमारतीत कोरोना उपचार केंद्र त्वरित सुरु करण्याची मागणी दशरथ फुले यांनी केली आहे.

      कोरोनोचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे गडबडलेली आहे कोरोनाने आजारी असणाऱ्या रुग्णांना बेड तसेच औषध उपचार वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे, शहरात असणाऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत असून ज्यांची परिस्थिती चांगली आहे असे लोक या हॉस्पिटलचा आर्थिक ताण सहन करित आहेत पंरतू सर्वसामान्य तसेच गोरगरिब कुंटुंबाला या हॉस्पिटलचा आर्थिक ताण सोसणे अशक्य आहे. गोरगरीब रुग्णाना उपचार मिळण्यासाठी या शासकीय रुग्णालयाची आवश्यकता असल्याचे दशरथ फुले यांनी स्पष्ट केले आहे.

      तिसरी लाट मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी रुग्णांना या जीवघेण्या आजारातून वाचविण्यासाठी तयारी करण्याची गरज आहे.

   सदर इमारत गेली २०/२५ वर्षे दुर्लक्षीत राहिल्याने इमारतीच्या दारे, खिडक्या अज्ञाताने काढून नेल्या असून अन्य नुकसान झाले आहे, तथापी प्रशासनाने रुग्णालय इमारत तातडीने दुरुस्त करुन तेथे आरोग्य सेवा सुरु करावी, असा आदेश व्हावा अशी मागणी दशरथ फुले जनहित याचिकेद्वारे न्यायालयाला केली आहे.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा