न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)
Nimbulak to Sathe Phata road is counting the last element.

आसू आनंद पवार.
फलटण पूर्व भागातील निंबळक ते साठे फाटा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
 फलटण पूर्व भागातील अत्यंत महत्वाचा असणारा हा मार्ग अखेरची घटका मोजत असताना प्रशासकीय यंत्रना याकडे का जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे.या रस्त्याने मोठ्या प्रमाणात उसाची वाहतूक सुरू असून मोठ्या प्रमाणात खड्डे व रस्त्याचे डांबर गायब झाले आसुन काही ठिकाणी खडी वर आली आहे या मार्गावरून साठे , राजाळे,आसू, माठाचीवडी या गावाकडे जाण्यासाठी हा मार्ग सोईस्कर असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक असते .
 त्यामुळे वेळीच संबधित विभागाने लक्ष देण्याची गरज असून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा