न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

साखरवाडी प्रतिनिधी (किसन भोसले ) साखरवाडी पिंपळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीपबाबा पवार यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारी सन्मान करण्यासाठी अमेरिकेतील गुगल कंपनीत उच्च पदावर काम करत असलेली साखरवाडी येथील मा. प्राथमिक शिक्षिका माधुरी शिंदे यांची कन्या प्रोफेसर डॉक्टर देविका शिंदे/ गरुड यांची निवड केली ८ मार्च हा जागतिक महिला दिन हा नारी सन्मान दिवस असल्याने या दिवशी संपूर्ण देशामध्ये महिलांचा सन्मान व सत्कार होत असतो असे असताना देशातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात एवढेच नव्हे तर आज महिला प्रत्येक क्षेत्रात नाव कमवताना दिसतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय विमानाची पायलट एक महिला आहे सैन्यातील तिन्ही दलामध्ये महिला अग्रेसर असून चूल आणि मूल या संस्कृतीच्या पलीकडे महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले असल्याचे प्रोफेसर डॉक्टर देविका शिंदे/ गरुड यांनी यावेळी सांगितले जागतिक स्तरावरील गुगल कंपनी ही एक आधुनिक सोशल मीडिया वरील देवदूता सारखी काम करत असून या गुगल कंपनी द्वारे लाखो लोक आपला व्यवसाय चालवतात व एवढेच नव्हे तर गुगल द्वारे हवी ती माहिती लगेच उपलब्ध करण्याचे काम होते ही यासाठी गुगल कंपनी खूप मेहनत घेत असते जगाला प्रत्येक गोष्टींचे तंतोतंत उत्तर देण्यासाठी गुगल नेहमीच तयार असते पुढील पाच वर्षांमध्ये या जगातील सोशल मीडियावरील काम गुगल द्वारे आणखी सोपे जाणार असल्याचे देविका शिंदे गरुड यांनी यावेळी सांगितले तरुणांनी अनेक प्रकारच्या वेबसाईट जर बनवल्या तर गुगल त्याला सपोर्ट करते एवढेच नव्हे तर अनेक प्रकारच्या जाहिरातीच्या माध्यमातून वेबसाईट बनवणाऱ्यांना आर्थिक लाभाचा फायदा गुगल कंपनी देते या लाभातून लाखो रुपये घरबसल्या कमावण्याची संधी तरुणांनी गमवू नये असेही डॉक्टर देविका यांनी यावेळी सांगून स्वतःकडे बुद्धी आणि कौशल्य असेल तर या जगात कोणतीच गोष्ट अवघड नसून अशाच विद्यार्थ्यांची गुगल कंपनी निवड केल्या वाचून राहत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी क्वालिफाईड बना असाही सल्ला यावेळी डॉक्टर देविका यांनी देऊन आपल्या गावचे व देशाचे तसेच आई वडिलांचे नाव उज्वल करून आणि स्वतःच्या पायावर उभे रहा असा सल्ला देऊन जग तुमचे वाट पाहत आहे असे सांगून माझ्याप्रमाणे ही तुम्हाला अमेरिकेला जाण्याची संधी मिळेल एवढेच जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर देविका यांनी शेवटी सांगितले 

 यावेळी दिलीपबाबा पवार यांनी डॉक्टर देविका शिंदे /गरुड यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन महिला दिनानिमित्त त्यांचा सत्कार केला व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी सातारा जिल्हा ग्राहक संघ प्रवासी वाहतूक संघाचे जिल्हा समिती सदस्य सोमनाथ मागाडे व ग्राहक पंचायत समिती फलटण तालुका सदस्य रवींद्र वेदपाठक साखरवाडी ग्रामपंचायतचे सदस्य विक्रम ढेंबरे यांची विशेष उपस्थिती होती

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा