न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

साखरवाडी प्रतिनिधी (किसन भोसले ) साखरवाडी येथील श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे या वर्षी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पिंपळवाडी येथील माऊली प्रसादिक भजनी मंडळाचा गायनाचा कार्यक्रम झाला त्याबद्दल भजनी मंडळातील गायक मंडळींचा सत्कार करताना साखरवाडी येथील श्री दत्त इंडिया साखर कारखान्याचे पर्यावरण व्यवस्थापक सचिन गणपत भोसले व साखरवाडी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष पैलवान महेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सचिन गणपत भोसले यांनी या महाशिवरात्री सोहळ्याप्रसंगी बोलून दाखवले सचिन भोसले व पल्लवी भोसले या उभयतांच्या हस्ते मंदिरातील महाशिवरात्री निमित्त आरती घेण्यात आली तत्पूर्वी माऊली प्रसादिक भजनी मंडळाच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी माऊली प्रसादिक भजनी मंडळातील पोपटराव भोसले वसंतराव हवालदार विठ्ठल हवालदार बाळासाहेब महादेव भोसले भगवान जाधव दत्ता खेसे हरिदास काटकर इत्यादी उपस्थित होते या महाशिवरात्री उत्सवामध्ये सचिन भोसले यांचे नेहमी सहकार्य असल्याचे या सोहळा समितीचे मुख्य आयोजक राजेंद्र ज्ञानदेव पवार यांनी सांगितले मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त पहाटे अभिषेक, पूजा दुपारी व संध्याकाळी महाआरती व आलेल्या हजारो भाविकांना उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले होते यासाठी साखरवाडी येथील ओंकार स्वीटचे मोठे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले

 किशोर जगताप बबलू बारगळे दादा जाधव सावंत, लोखंडे व उत्सव समितीचे सर्व कार्यकर्त्यांनी उत्सव व्यवस्थित पार पडण्यासाठी श्रमदान दिले यावेळी भाव भक्तांची सिद्धेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात रांग लागली होती विशेषता यावेळी महिला वर्गांची मोठी उपस्थिती होती.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा