न्युज अपडेट

(शेवटचे अपडेट 05:26:23 pm)

 फलटण - छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि जलनायक खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णामाई मेडिकल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित निकोप हॉस्पिटल, फलटण येथे आयोजित मोफत वैद्यकिय तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी व उपचार शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
    या शिबीरात निकोप हॉस्पिटलचे सर्वेसर्वा प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. जे. टी. पोळ, प्रख्यात दंतरोग तज्ञ डॉ. विश्र्वराज निकम, लायन्स मुधोजी नेत्र रुग्णालयाचे सर्व डॉक्टर्स आणि निकोपचे डॉ. कदम, डॉ. पिसाळ, डॉ. सौ. मेहता, डॉ. देशपांडे
यांच्या सह नर्सेस, स्टाफ यांनी रुग्णांची तसेच निकोप पॅथॉलॉजी विभागाचे सर्व तंत्रज्ञ यांनी रुग्णांची तपासणी केली. 
       महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशीयन्स, मुंबई येथील काही डॉक्टर्स मंडळींनी या शिबीरात सहभागी होऊन तपासणी व उपचार केले. ग्रामीण भागातील नागरिकांची मुंबईच्या निष्णात डॉक्टर्स कडून मोफत वैद्यकिय तपासणी हा एक वेगळा अनुभव फलटण करानी घेतला.
      डॉ. सुनिता पोळ,  हृदयरोग तज्ञ  डॉ. प्रणव देशमुख शेंडे, डॉ. जानव्ही पोळ, डॉ. देवयानी पोळ, डॉ. अवधूत शिंदे (आयुर्वेद), डॉ.अपुर्व दळवी, डॅा. संपदा हिंदुळे, डॅा. मयुर बेलदार, डॅा. सिद्धीराज खटावकर   वगैरे डॉक्टर्स टीमने या शिबीरात मोफत वैद्यकीय तपासणी व वैद्यकिय सल्ला दिला.
     या शिबीरात एकूण ७१९ विविध आजाराचे रुग्ण सहभागी झाले होते. त्यापैकी २७३ रुग्णांचे ECG आणि १५६  रुग्णांचे ECHO मोफत काढून त्यांना हृदय आजार आहे किंवा कसे याबाबत तपासणी करण्यात आली असता त्यापैकी बहुसंख्य रुग्ण हृदय रुग्ण नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना कसलेही उपचार करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाले. तरीही त्यांची नियमीत तपासणी मोफत करण्याचे सांगण्यात आले असून भविष्यात कसलाही आजार उदभवू नये यासाठी नियमीत तपासणी करुन घेण्याचे सुचविण्यात आले आहे.
      ४३९ नागरिकांची रक्त, लघवी तपासण्यात आली असून रक्त व लघवीतील साखर, कोलेस्ट्रॉल, हिमोग्लोबिन तपासणी अहवाल मोफत देण्यात आले.
     ३२० नागरिकांची जनरल आरोग्य तपासणी करण्यात आली, त्यापैकी ७२ नागरिकांच्या आरोग्य विषयक तक्रारीबाबत त्यांना योग्य सल्ला व औषधे देण्यात आली.
      १७६ नागरिकांनी आयुर्वेदिक तपासणी व उपचार घेणे पसंत केले त्यांना शिबीरास उपस्थित आयुर्वेद शास्त्रातील तज्ञ वैद्यांनी सल्ला व उपचार केले.
  लायन्स मुधोजी नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून १४६ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी १२ मोती बिंदू रुग्ण आढळले त्यांना लायन्स रुग्णालयात मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार असून ४० नागरिकांना डोळ्याचं नंबर काढून नंबरचे चष्मे देण्यात आले.
    दरम्यान या मोफत वैद्यकीय तपासणी शिबीराचे उद्घाटन सिव्हील सर्जन सातारा डॉ. सुभाष चव्हाण यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले. त्यावेळी उप जिल्हा रुग्णालय फलटणचे वैद्यकिय अधिकारी डॉ.धुमाळ, डॉ. शहा, डॉ. गायकवाड विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, सुशांत निंबाळकर, लायन मंगेश दोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
       या शिबीरात फलटण, माण, खटाव तालुक्यातील पत्रकारांची मोफत वैद्यकिय तपासणी व उपचार करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते, त्यानुसार काही पत्रकारांनी तपासणी करुन घेतली तथापि आज शिवजयंती कार्यक्रमांमुळे बहुसंख्य पत्रकार उपस्थित राहु शकले नसल्याने आगामी सप्ताहभर पत्रकारांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी मोफत करण्याचे डॉ. जे. टी. पोळ यांनी जाहीर केले असून ईच्छुकांनी फोन द्वारे वेळ घेऊन डॉ. जे. टी. पोळ यांच्याशी बोलून आपली वैद्यकिय तपासणी करुन घ्यावी असे सुचविण्यात आले आहे.
       दरम्यान हॉटेल आर्यमान येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. जे. टी. पोळ यांनी या उपक्रमाची माहिती दिल्यानंतर त्यांचे कौतुक करताना डॉ. जे. टी. पोळ कुटुंबीय सामाजिक बांधीलकी जपण्यात नेहमीच आघाडीवर असल्याचे सांगत त्यांच्या आजी श्रीमती कृष्णाबाई पोळ यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात कर्मवीर भाऊराव पाटील यांना रयत शिक्षण संस्थेसाठी देवापुर, ता. माण येथे गावकऱ्यांच्या सहकार्याने १०० एकर जमीन उपलब्ध करुन दिली, आज तेथे निवासी शाळा रयतच्या माध्यमांतून चालविण्यात येते. दुसऱ्या पिढीत डॉ. जे. टी. पोळ यांचे वडील स्व. तात्यासाहेब पोळ यांनी राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून लोकांना मदतीचा हात दिला, त्यांना पत्नी स्व. सेसाबाई पोळ यांची ऊत्तम साथ लाभली. तिसऱ्या पिढीत डॉ. जे. टी. पोळ आणि डॉ. सौ. सुनिता पोळ सामाजिक बांधीलकीचा वसा आणि वारसा जपत असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.

फोटो : सिव्हील सर्जन डॉ. सुभाष चव्हाण दीप प्रज्वलनाने शिबीराचे उद्घाटन करताना शेजारी डॉ. जे. टी. पोळ व अन्य मान्यवर.

संबंधित बातम्या

Stay Connected

हेही वाचा